Lokmat Agro >हवामान > Jayakawadi dam : सिंचनक्षेत्रात जलक्रांती: जायकवाडीचा उजवा कालवा आता होणार 'सुपरफास्ट' वाचा सविस्तर

Jayakawadi dam : सिंचनक्षेत्रात जलक्रांती: जायकवाडीचा उजवा कालवा आता होणार 'सुपरफास्ट' वाचा सविस्तर

Jayakawadi dam: latest news Water revolution in irrigation sector: Jayakawadi's right canal will now be 'superfast' Read in detail | Jayakawadi dam : सिंचनक्षेत्रात जलक्रांती: जायकवाडीचा उजवा कालवा आता होणार 'सुपरफास्ट' वाचा सविस्तर

Jayakawadi dam : सिंचनक्षेत्रात जलक्रांती: जायकवाडीचा उजवा कालवा आता होणार 'सुपरफास्ट' वाचा सविस्तर

Jayakawadi dam : मराठवाड्याच्या शेतीला (irrigation) जीवदान देणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची दुरुस्ती आता अंतिम टप्प्यात आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. (Jayakawadi dam)

Jayakawadi dam : मराठवाड्याच्या शेतीला (irrigation) जीवदान देणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची दुरुस्ती आता अंतिम टप्प्यात आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. (Jayakawadi dam)

शेअर :

Join us
Join usNext

छत्रपती संभाजीनगर:

मराठवाड्याच्या शेतीला (irrigation) जीवदान देणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची दुरुस्ती आता अंतिम टप्प्यात आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. (Jayakawadi dam)

शासनाच्या ५२० कोटींच्या निधीमधून युद्धपातळीवर सुरू असलेल्या कामामुळे कालव्याची वहनक्षमता दुपटीने वाढली असून, पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे चालू उन्हाळी हंगामात (irrigation) प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी माजलगाव धरणापर्यंत पोहोचवण्यात यश आले आहे. (Jayakawadi dam)

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली (irrigation) आणणाऱ्या मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले असून यासाठी शासनाने तब्बल ५२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. (Jayakawadi dam)

उजव्या कालव्याच्या दुरुस्तीमुळे पाणीगळती थांबली असून वहनक्षमता दुप्पटीने वाढली आहे. जायकवाडी प्रकल्पापासून शेवटच्या टोकापर्यंत उजवा कालव्याची लांबी १३२ किमी आहे. (Jayakawadi dam)

या कालव्याद्वारे छत्रपती संभाजीनगर, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ४१ हजार ६८२ हेक्टर सिंचन होते. हा कालवा माजलगाव जलाशयापर्यंत २९९ द.ल.घ.मी. पाणी वाहून नेण्यासाठी वापरला जातो.

सन १९८४ मध्ये या कालव्याचे काम पूर्ण झाले. तेव्हापासून आतापर्यंत या कालव्याद्वारे ९०० ते १००० क्युसेस क्षमतेनेच चालविण्यात येतो. मात्र कालव्याच्या दुरवस्थेमुळे यापेक्षा जादा वहन क्षमतेने चालविण्यात काही अडचणी येत होत्या. (Jayakawadi dam)

या पार्श्वभूमीवर सन २०२३ मध्ये राज्यसरकारने जायकवाडी प्रकल्प टप्पा २ ला मंजुरी दिली. याअंतर्गत संपूर्ण १३२ किलोमीटर लांबीच्या कालव्याचे अस्तरीकरण प्रगत तंत्रज्ञान वापरून करण्याचा निर्णय झाला. (Jayakawadi dam)

जलसंपदा विभागाने मागीलवर्षी मार्च महिन्यात या कामाला सुरुवात केली. आज १३२ कि.मी. पैकी १०५ किमी (८०%) कामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती 'कडा'चे मुख्य अभियंता जयंत गवळी यांनी दिली.

या कामामुळे चालू उन्हाळी हंगाममध्ये सिंचन (irrigation) आवर्तनामध्ये ऐतिहासिक यश प्राप्त झाले आहे. प्रकल्पाच्या स्थापनेपासून प्रथमच, पैठण उजव्या कालव्यातून १६०० क्युसेस एवढ्या प्रचंड क्षमतेने विसर्ग यशस्वीरीत्या चालू आहे.

यापूर्वी एवढा विसर्ग माजलगाव धरणामध्ये कधीच पोहोचला नाही. चालू हंगामध्ये अंतिम टप्प्यात आणखी पूर्ण विसर्ग क्षमतेने २२५० क्युसेस करण्याचे नियोजन 'कडा' करीत आहे.

गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता जयंत गवळी आणि अन्य अधिकाऱ्यांनी यासाठी पाठपुरावा केल्याने हे शक्य झाल्याचे दिसून येते.

क्षमता वाढली

कालव्याचे नव्याने अस्तरीकरण केल्याने कालव्याची पाणी गळती बंद झाली. शिवाय पाण्याचा अपव्यय कमी होऊन कालव्याची क्षमता वाढली आहे. पाणी वितरण अधिक प्रभावी झाले आहे. उपसा परवानगीचे प्रमाण वाढलेले आहे.

पूर्वी उजव्या कालव्याद्वारे सिंचन आवर्तन २० ते २२ दिवस चालवावे लागत होते. आता कालव्याच्या दुरुस्तीमुळे हेच आवर्तन केवळ १३ ते १४ दिवसांत पूर्ण होत आहे. परिणामी पाण्याची मोठी बचत झाली. माजलगाव धरणापर्यंत प्रथमच इतका मोठा विसर्ग पोहोचवला आहे. कालव्यातील अस्तरीकरणामुळे पाण्याचा अपव्यय कमी झाला असून, कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. - जयंत गवळी, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग

हे ही वाचा सविस्तर : Sugarcane Cultivation: पाणी भरपूर, ऊसही जोमात; तरीही भाव 'कडवट'! वाचा सविस्तर

Web Title: Jayakawadi dam: latest news Water revolution in irrigation sector: Jayakawadi's right canal will now be 'superfast' Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.