Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या 'या' धरण पाणलोट क्षेत्रात किती पाणीसाठा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:30 IST

शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे धरणाचे चारही स्वयंचलित दरवाजे व वीजनिर्मिती केंद्र बंद केले.

शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे धरणाचे चारही स्वयंचलित दरवाजे व वीजनिर्मिती केंद्र बंद केले असून, त्यातून विसर्ग पूर्णपणे बंद केला आहे.

मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील भात पिकांच्या पन्नास टक्केच पेरण्या झाल्या आहेत, तर नदीकाठावरील शेतातील पिके पाण्याखाली राहिल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या चोवीस तासांत पाथरपुंज येथे ३, निवळे १, धनगरवाडा १, चांदोली १ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक १३६० क्युसेक सुरू झाला आहे. त्यामुळे धरणाचे चारही स्वयंचलित दरवाजे, तसेच वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग बंद केला आहे.

चांदोली धरण परिसरात सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासांत १ मि.मी. पाऊस झाला आहे. चांदोली धरणात आजअखेर २८.८१ टीएमसी म्हणजे ८३.७६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

धरणाची ६२१.१५ मीटर पाणीपातळी आहे. गतवर्षी धरणात २८.८९ टीएमसी पाणीसाठा होता. गेल्या काही दिवसांपासून पावसाने तालुक्यात बऱ्यापैकी उघडीप दिली आहे.

आजअखेर २ हजार १३७ हेक्टरमध्ये भातरोपाची लावणी केली असून, एकूण ५ हजार ८४६ हेक्टरमध्ये भातशेती आहे.

चांदोली पाणलोट क्षेत्रातील पावसाची नोंद मिमीमध्येपाथरपुंज - ३ मिमी (४५६९)निवळे - १ (३७०६)धनगरवाडा - १ (२३०५)चांदोली - १ (२११५)

अधिक वाचा: उसाचे बिल जमा करण्यात कारखाने करतायत फसवणूक; दिलेले चेक होतायत बाऊन्स

टॅग्स :धरणपाणीसांगलीशेतीपाऊसमहाराष्ट्रभात