Join us

नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा-देवघर, वीर, गुंजवणी धरणात किती पाणीसाठा; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:45 IST

नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२४मध्ये पाऊस लवकर पडला. या हंगामात धरण लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने त परतीच्या पावसानेही दमदार हजेरी लावली.

नातेपुते : नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२४मध्ये पाऊस लवकर पडला. या हंगामात धरण लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने त परतीच्या पावसानेही दमदार हजेरी लावली.

त्यामुळे चारही धरणे १०० टक्के भरून दोन आठवड्यांहून अधिक काळ वाहिली. आता या नीरा खोऱ्यातील चार धरणांत गुरुवारअखेर गतवर्षापेक्षा सरासरी टक्क्यांनी १० अधिकचा पाणीसाठा असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

नीरा खोऱ्यातील चार धरणांत २७.५६ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून मागील वर्षी आजच्या दिवशी १७.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

वीर धरणात ५४.८२ टक्के पाणीसाठा असलेल्या दोन्ही कालव्यांतून मुबलक प्रमाणात सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जात आहे.

नीरा डाव्या कालव्यातून ८२७ क्युसेकने, तर नीरा उजव्या कालव्यातून १,५५० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

१२ हजार ८३४ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा◼️ ४८,३२९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या नीरा खोऱ्यातील चारही धरणांत एकूण १२,८३४ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच २६.५६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.◼️ गतवर्षी ८,३५१ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात १७.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे जून महिन्यापर्यंत दोन्ही कालव्यांतून नियमित विसर्ग सोडण्यात येईल.

मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड झाली◼️ नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी व वीर ही धरणे १०० टक्यांच्यावर भरली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असला तरी यावर्षी उन्हाळाही कडक आहे.◼️ सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून उन्हाची प्रचंड दाहकता दुपारी दिसून येत आहे. मे महिन्यामध्ये तर उष्णतेच्या लाटा येणार असल्याचे हवामान अभ्यासक सांगत आहेत.◼️ शेती सिंचनाला पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली, तर रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा व उन्हाळी सोयाबीन लागवड शेतकऱ्यांना करता आली. 

अधिक वाचा: राज्यात जलसंधारण महामंडळाकडून केली जाणारी ही कामे होणार रद्द; मुख्यमंत्र्यांचे आदेश

टॅग्स :धरणपाणीपुणेशेतीशेतकरीपाटबंधारे प्रकल्पसोयाबीनपीकऊसरब्बीरब्बी हंगाम