Maharashtra Weather Update : फेब्रुवारीचा महिन्यात उन्हाची चाहुल लागली आहे. हवामानात अनेक बदल होताना दिसत आहे. राज्यातून थंडी गायब झाली असली तरी पहाटेच्या वेळी निवडक जिल्ह्यांमध्ये गारठा जाणवत आहे तर वगळता उर्वरित जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसह कोकण किनारपट्टी क्षेत्र, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातही कमाल तापमानात वाढ होताना दिसत आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उन्हाच्या झळा वाढत असून, मुंबईत तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिआवर पोहोचला असून, राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूरमध्ये (Solapur) करण्यात आली आहे. इथे पारा ३७.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे त्यामुळे हवामान विभागाने (Department of Meteorology) नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत राज्यात पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.
राज्यात निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर राज्यात कमाल आणि किमान तापमानात १० ते २२ अंश सेल्सिअसचा फरक जाणवत आहे. पुढील २४ तासांमध्ये राज्यात तापमानवाढ (Warming) अपेक्षित असून, उष्मा (Heat) आणखी वाढणार असल्यामुळे नागरिकांनी आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आवश्यक असल्यास दुपारच्या वेळी घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिमी विक्षोभमुळे (Western Disturbance) देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांवर पावसाचे सावट पाहायला मिळणार आहे. राजस्थानमध्ये याचा सर्वाधिक परिणाम पाहायला मिळणार आहे. तर उत्तराखंडमध्ये अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सोमवारी येथे झाली जास्त कमाल तापमानाची नोंद
सोलापूर | ३७.४ |
ब्रह्मपुरी | ३७.२ |
अकोला | ३६.७ |
जेऊर | ३६.५ |
परभणी | ३६.५ |
नागपूर | ३६.५ |
चंद्रपूर | ३६.४ |
सांगली | ३६.३ |
वर्धा | ३६ |
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
* रेशीम उद्योजकांच्या रेशीम अळ्या कोष न करणे किंवा पोचट कोष होणे हा प्रश्न आहे. बहुतांशी शेतकरी कापूस, ऊस, सोयाबीन व भाजीपाला आदी पिकांकडून तुती लागवडीकडे वळलेले आहेत, असा सल्ला देण्यात आला आहे.