Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसराला अलर्ट 

कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसराला अलर्ट 

High waves warning issued for Konkan coast, Ratnagiri, Sindhudurg, Satara Ghat areas on alert | कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसराला अलर्ट 

कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसराला अलर्ट 

Maharashtra Weather Update : कोकण किनारपट्टीला २५ जून रोजी रात्री ८:३० पर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, हवामान खात्याकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Maharashtra Weather Update : कोकण किनारपट्टीला २५ जून रोजी रात्री ८:३० पर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, हवामान खात्याकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

कोकण किनारपट्टीला २५ जून रोजी रात्री ८:३० पर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, हवामान खात्याकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस अजूनही सरींवर असून अद्याप त्यात सातत्य नाही. मध्येच सरी तर मध्येच ऊन असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे उकाडा वाढला आहे.

कोकण किनारपट्टीवर सोमवार (दि. २३ जून) पासून २५ जून रोजी रात्री ८:३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा (आयएनसीओआयएस) तर्फे केंद्र उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

राज्यात पुढील २४ तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात अद्यापही पावसाने गती घेतली नसून सरींवरच सुरू आहे. मध्येच कडाक्याचे ऊन पडत आहे. 

हेही वाचा : 'लिंबोणी'ने दिली आयुष्याला कलाटणी; ३० गुंठ्यांमध्ये रानबा खरातांनी साधली आर्थिक प्रगती

Web Title: High waves warning issued for Konkan coast, Ratnagiri, Sindhudurg, Satara Ghat areas on alert