Lokmat Agro >हवामान > कोल्हापूर जिल्ह्यात धुवांधार पाऊस; आजऱ्यासह 'या' ४ तालुक्यांत अतिवृष्टी

कोल्हापूर जिल्ह्यात धुवांधार पाऊस; आजऱ्यासह 'या' ४ तालुक्यांत अतिवृष्टी

Heavy rain in Kolhapur district; Heavy rainfall in these 4 talukas including Ajar | कोल्हापूर जिल्ह्यात धुवांधार पाऊस; आजऱ्यासह 'या' ४ तालुक्यांत अतिवृष्टी

कोल्हापूर जिल्ह्यात धुवांधार पाऊस; आजऱ्यासह 'या' ४ तालुक्यांत अतिवृष्टी

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर संततधार सुरू आहे. धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत असून, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर संततधार सुरू आहे. धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत असून, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर संततधार सुरू आहे. धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत असून, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. धरणातील विसर्ग वाढल्याने सर्वच नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून, पंचगंगा नदी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली आहे.

पंचगंगेची पातळी ३२ फुटांपर्यंत पोहोचली असून, दिवसभरात साडेतीन फुटाने पाणी वाढले. विविध नद्यांवरील ४५ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. 'घटप्रभा 'पाठोपाठ गगनबावडा तालुक्यातील 'कोदे' धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

सोमवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे दिवसभर संततधार सुरू राहिली.

धरणक्षेत्रात तर मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली, तरी चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे.

राधानगरी धरणक्षेत्रात १३९, तर दूधगंगा धरणक्षेत्रात १५१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३१००, तर वारणातून १७०० व दूधगंगेतून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 'कोदे' धरण ०.२१ टीएमसी क्षमतेचे असून, त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

डोंगरावरील माती सरकली!

कोल्हापूर जिल्हयात पाटपन्हाळा, ता. राधानगरी येथे डोंगर उतारावरील माती सरकण्यास सुरवात झाल्यामुळे खबरदारी म्हणून डोंगरापासून २०० मीटर अंतरावर असणाऱ्या शाळेतील सर्व वर्ग सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत. गाव डोंगरापासून २ किमी अंतरावर असून कोणताही धोका नाही.

पनोरी ते फराळे कारखाना रोड वाहतूक सुरू कोल्हापूर जिल्हयात राधानगरी तालुक्यातील पनोरी ते फराळे कारखाना रोडवर दरड कोसळली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता रिकामा केला असून वाहतुक सुरळीत चालू आहे.

एसटीचे ३ मार्ग अंशतः बंद

बंधाऱ्यावर पाणी असल्याने अनेक मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू असली, तरी एसटीचे तीन मार्ग अंशतः बंद झाले आहेत.

झडीचा पाऊस अन् गारठा

वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत असल्याने वातावरणात गारठा जाणवत आहे. साधारणतः जुलै-ऑगस्ट महिन्यात अशा प्रकारचा झडीचा पाऊस पडतो. त्याचा अनुभव जून महिन्यातच येत आहे.

धरणातून पाण्याचा विसर्ग (प्रतिसेकंद घनफूटांमध्ये)

३१०० - राधानगरी
१७०० - वारणा
१६०० - दूधगंगा

हेही वाचा : तृणधान्य व कडधान्यांच्या जागी आता ऊस, द्राक्ष, डाळिंब; 'टेंभू'ची साथ अन् बदलत्या पीक पॅटर्नने शेतकऱ्यांना केले मालमाल

Web Title: Heavy rain in Kolhapur district; Heavy rainfall in these 4 talukas including Ajar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.