पुणे: ज्या सूखसरींची राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते तो मान्सून यंदा १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मे महिन्यातच राज्यात मान्सून येण्याची ही १६ वर्षातील पहिलीच वेळ आहे.
विशेष म्हणजे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये मान्सून रविवारी चक्क तळकोकणात पोहोचला आहे. कर्नाटक आणि संपूर्ण गोवा राज्यातही त्याने धडक दिली.
पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबई, पुण्यात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
मान्सूनने रविवारी संपूर्ण गोता आणि देवगडपर्यंत भाग व्यापला. देवगढ, बेळगावी, हावेरी, धर्मपुरी, चेन्नई आणि कोहिमामार्गे मान्सून जात आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या मराठवाडचाच्या भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
त्यामुळे पुढील चार दिवसांत कोकण, गोव्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वान्यासह जोरदार पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पेरणीची घाई करू नका
◼️ किमान ५ जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता दिसत नाही. यादरम्यान देशातील इतर भागांत सुद्धा मान्सूनचा प्रतास तात्पुरता थांबू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
◼️ या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला, जे सामान्य तारखेपेक्षा १० दिवस आधीच आहे. मात्र, २७ मेपासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील.
◼️ सध्याच्या अंदाजानुसार २७ मेपासून राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल.
◼️ मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे आणि किमान ५ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. अशात राज्यातील अनेक भागांत दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे.
इशारा
आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल, अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली, तर शेतकऱ्यांचे नुकसान शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्रात (दि. २६ ते ३१) पर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हवेचा दाब २२८ ते १००० इतका आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर प्रचंड राहील. शिवाय सध्या पोषक वातावरण असल्यामुळे संपूर्ण राज्य दोन ते तीन दिवसात मोसमी पाऊस व्यापेल. तसेच महाराष्ट्रात हवेचा दाब कमी झाला आहे. त्यामुळे जूनमध्ये पाऊस कायम राहणार आहे. - डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ
अधिक वाचा: शेतकऱ्यांना कर्ज देताना खरच सिबिल स्कोअरची गरज आहे का? जाणून घ्या सविस्तर