Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > मुळा, पवना नद्यांना फेसाचा पूर; रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्याने पर्यावरणवादी संघटनांकडून प्रशासनाचा निषेध

मुळा, पवना नद्यांना फेसाचा पूर; रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्याने पर्यावरणवादी संघटनांकडून प्रशासनाचा निषेध

Foam floods Mula, Pavana rivers; Environmental organizations protest administration for releasing chemical-laden water into the river | मुळा, पवना नद्यांना फेसाचा पूर; रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्याने पर्यावरणवादी संघटनांकडून प्रशासनाचा निषेध

मुळा, पवना नद्यांना फेसाचा पूर; रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्याने पर्यावरणवादी संघटनांकडून प्रशासनाचा निषेध

पावसाळी पाणी वाहून जाणारी महापालिकेची यंत्रणा गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने कुचकामी ठरली. त्यातच पवना आणि मुळा नदीला शुक्रवारी सकाळी फेसाचा पूर आला. नाले, उद्योगांचे रसायनयुक्त पाणी नदीत थेटपणे सोडले जात असल्याने पर्यावरणवादी संघटनांनी प्रशासनाचा निषेध केला.

पावसाळी पाणी वाहून जाणारी महापालिकेची यंत्रणा गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने कुचकामी ठरली. त्यातच पवना आणि मुळा नदीला शुक्रवारी सकाळी फेसाचा पूर आला. नाले, उद्योगांचे रसायनयुक्त पाणी नदीत थेटपणे सोडले जात असल्याने पर्यावरणवादी संघटनांनी प्रशासनाचा निषेध केला.

पिंपरी शहरामध्ये पावसाळी पाणी वाहून जाणारी महापालिकेची यंत्रणा गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने कुचकामी ठरली. त्यातच पवना आणि मुळा नदीला शुक्रवारी सकाळी फेसाचा पूर आला. नाले, उद्योगांचे रसायनयुक्त पाणीनदीत थेटपणे सोडले जात असल्याने पर्यावरणवादी संघटनांनी प्रशासनाचा निषेध केला.

महापालिकेने दुर्लक्ष केल्याबद्दल नदीवर जाऊन निषेध नोंदविला. पिंपरी-चिंचवड शहरात पवना नदी किवळेपासून दापोडीपर्यंत आणि मुळा नदी वाकडपासून दापोडीपर्यंत प्रदूषित होत आहे. मुळा आणि पवना नदीत शुक्रवारी सकाळी फेसाचा पूर आला. मुळा नदीवरील चोंधे पाटील रस्ता पिंपळे निलख पुलापासून मोठ्या प्रमाणावर नदी फेसाळल्याचे दिसून आली.

शुक्रवारी सकाळी पवना नदी आणि मुळा नदी येथे फेसाचा पूर आल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनावर टीका होत आहे. याबाबत कारवाईची मागणी होत आहे.

प्रदूषण नियंत्रणकडून प्रतिसाद नाही

अनेक पर्यावरणवादी संघटना आणि माध्यमांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना फोन केला. नदी फेसाळल्याचे व्हिडीओ आणि छायाचित्रे पाठवली. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

केजूदेवी परिसरामध्ये पाच वर्षांपासून नदी प्रदूषणाच्या तक्रारी येत आहेत. आंदोलने केली, पत्रे पाठविली. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत आहेत. कारवाई होणे गरजेचे आहे. - नितीन भागवत, पर्यावरणवादी.

नदी प्रदूषण रोखणे आणि उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात नाहीत. प्रदूषण रोखून पवना नदीचे संवर्धन करण्याची गरज आहे. - नीलेश पिंगळे, अध्यक्ष, थेरगाव सोशल फाउंडेशन.

थेरगाव येथील पवना नदीवरील केजूदेवी मंदिर परिसरात बोट क्लबपासून थेरगाव पुलापर्यंत नदी फेसाळली होती. प्रशासनाचे दुर्लक्ष होते आहे. परिस्थिती भयंकर आहे. यावर लवकर कार्यवाही करणे आवश्यक आहे. - उल्हास टकले, नागरिक

नदी फेसाळल्याबाबत नागरिकांकडून माहिती मिळाली. त्यानंतर पर्यावरण विभागाच्या पथकाने पाहणी केली आहे. कुणामुळे प्रदूषण होत आहे, हे शोधून कारवाई केली जाईल. - संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग.

हेही वाचा : पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड; विक्रमी उत्पादन घेत फायद्याची शेती करणारे सुधारकराव

Web Title : मुला, पवना नदियों में झाग का सैलाब; रसायन रिसाव पर पर्यावरणविदों का विरोध।

Web Summary : पिंपरी की मुला और पवना नदियाँ औद्योगिक रसायनों के रिसाव से झाग से भर गईं। पर्यावरण समूहों ने प्रशासन की लापरवाही का विरोध किया। शिकायतों और सबूतों के बावजूद, प्रदूषण नियंत्रण अधिकारियों ने कोई जवाब नहीं दिया, जिससे नदी के प्रदूषण पर गंभीर चिंताएं बढ़ गईं और तत्काल कार्रवाई की मांग की गई।

Web Title : Foam floods Mula, Pavana rivers; environmentalists protest chemical discharge.

Web Summary : Pimpri's Mula and Pavana rivers are choked with foam due to industrial chemical discharge. Environmental groups protested the administration's negligence. Despite complaints and evidence, pollution control officials remained unresponsive, raising serious concerns about river contamination and demanding immediate action.