Lokmat Agro >हवामान > 'बोरी' नदीच्या पुरामुळे १९ गावांमध्ये हाहाकार; जनावरे वाहून गेली तर शेतात पाणी, घरांची पडझड

'बोरी' नदीच्या पुरामुळे १९ गावांमध्ये हाहाकार; जनावरे वाहून गेली तर शेतात पाणी, घरांची पडझड

Flooding of the 'Bori' river causes havoc in 19 villages; Animals are washed away, fields are flooded, houses collapse | 'बोरी' नदीच्या पुरामुळे १९ गावांमध्ये हाहाकार; जनावरे वाहून गेली तर शेतात पाणी, घरांची पडझड

'बोरी' नदीच्या पुरामुळे १९ गावांमध्ये हाहाकार; जनावरे वाहून गेली तर शेतात पाणी, घरांची पडझड

Flood Update : अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीला गुरुवारी आलेल्या पुरामुळे १९ गावांतील २२० घरांत नदीचे पाणी शिरले. यामुळे संसारातील उपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे, तसेच शेतकऱ्यांची १९ जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत तर २१ घरांची पडझड झाली आहे.

Flood Update : अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीला गुरुवारी आलेल्या पुरामुळे १९ गावांतील २२० घरांत नदीचे पाणी शिरले. यामुळे संसारातील उपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे, तसेच शेतकऱ्यांची १९ जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत तर २१ घरांची पडझड झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीला गुरुवारी आलेल्या पुरामुळे १९ गावांतील २२० घरांत नदीचेपाणी शिरले. यामुळे संसारातील उपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे, तसेच शेतकऱ्यांची १९ जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत तर २१ घरांची पडझड झाली आहे.

शेतकरी वर्ग भयभीत आहे. त्वरित पंचनामा करून आर्थिक मदत मिळाती याची मागणी सुरू आहे. तोरी नदीला गुरुवारी आलेल्या पुरामुळे १९ गातांतील २२० घरांत नदीचे पाणी शिरले आहे.

बुधवार व गुरुवार असे दोन दिवस तालुक्यात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, मुरुवारी रात्रभर रेकॉर्ड ब्रेक असे ९ पैकी ७ महसूल मंडळांमध्ये एकाच दिवसात ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला.

बोरी नदीला अचानकपणे पूर आल्याने शेतक-यांची धांदल उडाली. शेती पिकासह जनावरे पाण्यात वाहून गेली. अनेकांच्या घरांची पडड़ाह झाली आहे. आमदार सविन कल्याणशेट्टी, तहसीलदार विनायक मगर, गटविकास अधिकारी शंकर कवितके आदी गावभेट दौरा करून शेतकऱ्यांना धीर देण्याचे प्रयत्न करीत आहेत.

या गावातील घरात पाणी शिरले...

घोळसगाव येथील ६ घरांत पाणी शिरले आहे. शिरसी १७ घरे, सांगवी खु. ५. सांगवी बु, ४, ममनाबद ५, रामपूर १५, उमरगे २५, मिरजगी शेतवस्ती, असे मिळून ३०, आंदेवाडी ५. बबलाद ७०, जकापूर ४. बिजमेर ५, असे २२० घरांत पाणी शिरले आहे. तसेच आआंदेवाडी येथे एका घराची तर किणीत ५ घरांची पडझड झाली आहे. २२० घरांत पाणी शिरले आहे. तर २१ घरांची पडझड झाली आहे.

संसारोपयोगी साहित्याचे नुकसान

घरातील गहू, ज्वारी, तांदूळ, कपडे, असे संसारोपयोगी साहित्य भिजून गेले आहे. अनेकांचा संसार उधग्रहावर आला असून, कोण शाळेत, तर कोण समाज मंदिर तात्पुरता आसरा घेतला आहे. तसेच अनेक शेतक-यांचे पंप पाणबुडीसह वाहून गेले आहेत,

जोरदार पाऊस आणि नदीला आलेल्या पुराने शेतकऱ्यांचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. आमच्या डोळ्यासमोर होत्याचं नव्हते झालं आहे. काहीच शिल्लक राहिले नाही. शासनाने शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी. - महादेव कोणदे, शेतकरी, रामपूर.

या गावातून जनावरे वाहून गेली..

नन्हेगाव ४ म्हशी अन् ०२ वासरे आणि बोरेगाव येथे ओढघालगत घरातील पाच कोंबड्या व १७ ते २० पिले पाण्यात वाहून गेली. भोट्याळ १३ जनावरे, शिस्थळ येथे २ म्हशी, १ कालवा अशी तीन जनभारे पुरुच्या पाण्यात वाहून गेली. लाखो रुपये किमतीची दुभती जनावरे व खेळते भांडवल असलेल्या कौबहुधा पशुपालकांच्या नजरेसमोरून वाहत गेल्या.

२४ तासांपासून नदीकाठच्या गावांचा वीजपुरवठा खंडित

• अतिवृष्टी आणि पुरामुळे अक्कलकोटमधील बोरी नदीकाठच्या अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. २०० पेक्षा अधिक वीजखांब कोसळले आहेत आणि तारांच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत.

• त्यातले ४ डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉइट) जमीनदोस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी त्वरित परिस्थित्ती सुधारण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू ठेवले आहेत.

• बोरी नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पाण्याच्या प्रेशरने नदीकाठीच्या वीजपुरवठा करणारे खांब कोसळले आणि तारा तुटल्या. अनेक रोहिजे जळाल्यामुळे मिरजगी येथील सब स्टेशन पूर्णपणे बंद पडला, ज्यामुळे दहापेक्षा अधिक गावे अंधारात गेली.

• अनेक गावांना तत्काळ पर्यायी व्यवस्थेमुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, लागोपाठ मुसळधार पावसामुळे एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांना काम करण्यात अडथळा येत राहिला. दुरुस्तीच्या कामांमध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे.

डीपी जळाले; गावं अंधारात

मैदगी, ट्वनी, वागदरी, तडवळ या गावांमध्ये एकूण ४ डीपी जमीनदोस्त झाले आहेत. तसेच १४ रोहित्रे जळून नष्ट झाली आहेत. मिरजगी येथील सबस्टेशन पूर्णपणे बंद पडल्याने मिरञ्जगी, हत्तीकणबस, अकापूर, इटगे, रामपूर, कंठेहळळी, गौडगाव, उमरगे यासह अनेक गावं अंधारात गेली आहेत.

बोरी नदीकाठच्या खांब, तारे, डीपी आणि रोहित्रे यांची भरपूर हानी झाली आहे. उच्च व लघु दाबाच्या चीज वितरण व्यवस्था ठप्प झाली आहे. या परिस्थितीत काही गावांमध्ये पर्यायी मार्गे चीजसेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. - राजकुमार आदम उपकार्यकारी अधिकारी, अक्कलकोट जि. सोलापूर. 

हेही वाचा : यंदा कांदा रोपांची रोगमुक्त वाढ हवीय? मग 'हा' नैसर्गिक उपाय आवर्जून करा 

Web Title: Flooding of the 'Bori' river causes havoc in 19 villages; Animals are washed away, fields are flooded, houses collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.