Join us

पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली; 'या' जिल्ह्यात २२ जुलैपर्यंत तब्बल २५ टक्के पावसाची तूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:27 IST

जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जून महिन्यात १०० टक्के सरासरी गाठलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या २२ तारखेपर्यंत तब्बल २५ टक्क्यांची तूट निर्माण केली आहे. केवळ जुलै महिन्याचा विचार केल्यास ही तूट ४६ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जून महिन्यात १०० टक्के सरासरी गाठलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या २२ तारखेपर्यंत तब्बल २५ टक्क्यांची तूट निर्माण केली आहे. केवळ जुलै महिन्याचा विचार केल्यास ही तूट ४६ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

जिल्ह्यातील रावेर, यावल, धरणगाव आणि अमळनेर या तालुक्यांमध्ये पावसाची प्रचंड तूट दिसून येत आहे. यावल तालुक्यात ५८ टक्के, धरणगाव तालुक्यात ५२ टक्के, तर अमळनेर तालुक्यात ५० टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान रावेर तालुक्यात मंगळवारपर्यंत ६५ टक्के पावसाची तूट होती, मात्र मंगळवारी रात्री येथे महिनाभरानंतर दमदार पाऊस झाला.

रावेरला चिंता कायम

मंगळवारी रात्री रावेर तालुक्यात ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, ज्यात खानापूर व रावेर या दोन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीही झाली. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी, सावदा व खिर्डी महसूल मंडळांमध्ये पावसाची ७० टक्के तूट आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस

तालुका २२ जुलैपर्यंत सरासरी पाऊस झालेला पाऊस टक्केवारी 
जळगाव २२७ मिमी २४२ मिमी ८१ टक्के 
भुसावळ २६५ मिमी २८३ मिमी १०६ टक्के 
यावळ २७९ मिमी ११७ मिमी ४२ टक्के 
रावेर २६१ मिमी १३८ मिमी ५३ टक्के 
मुक्ताईनगर २३२ मिमी १७१ मिमी ७३ टक्के 
अमळनेर २५२ मिमी १२८ मिमी ५० टक्के 
चोपडा २८६ मिमी १६६ मिमी ५८ टक्के 
एरंडोल २६३ मिमी २२९ मिमी ८७ टक्के 
पारोळा २५८ मिमी २७३ मिमी १०५ टक्के 
चाळीसगाव २४६ मिमी १९२ मिमी ७८ टक्के 
जामनेर २८४ मिमी २४३ मिमी ८५ टक्के 
पाचोरा २४९ मिमी  २५६ मिमी  १०२ टक्के 
भडगाव २५६ मिमी २६५ मिमी १०३ टक्के 
धरणगाव ३०८ मिमी १४५ मिमी ४७ टक्के 
बोदवड २७५ मिमी २६१ मिमी ९४ टक्के 

जळगाव जिल्ह्याची सद्यःस्थिती आणि पिकांची अशी आहे गरज

• मंगळवारी रात्री जळगाव जिल्ह्यात एकूण १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

• रावेर व्यतिरिक्त मुक्ताईनगरात २७ मिलिमीटर, तर बोदवड तालुक्यात ३५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

• या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी, दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

• सध्या कापूस, उडीद, मूग आणि मका या पिकांना पाण्याची तातडीची गरज आहे. आगामी दोन-तीन दिवसांत पाऊस झाल्यास शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात मिटू शकते.

२६ जुलैला मुसळधार पावसाचा अंदाज; यलो अलर्ट

हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. आगामी दोन दिवस ठराविक तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर २६ जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यासाठी जिल्ह्यात यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. वेगवान वाऱ्यांमुळे उकाडा कमी होणार आहे.

हेही वाचा : अवर्षणाच्या फेऱ्यात मिळाली रेशीम शेतीची भक्कम साथ; कुप्पाच्या शेतकऱ्याने ७० गुंठ्यांत घेतले दहा लाखांचे उत्पन्न

टॅग्स :जळगावपाऊसशेती क्षेत्रशेतीशेतकरीपाणीधरणनदी