देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या 'मान्सून'बाबत भारतीय हवामान विभागाने सोमवारी आपला पहिला अधिकृत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला.
monsoon 2026 update यंदा देशात मान्सूनचा पाऊस 'सरासरीपेक्षा कमी' राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात यंदा मोसमी हंगामात सुमारे ८० सेंटीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
भारतातील मौसमी पावसाची १९७१ ते २०२० या कालावधीतील दीर्घकालीन सरासरी ८७ सेंटीमीटर आहे. मान्सूनच्या अंदाजात ५ टक्क्यांची त्रुटी (मॉडेल एरर) राहू शकते.
पाऊस किती?जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात देशात सरासरी ९२% पावसाचा अंदाज.
महाराष्ट्रात कसा असेल पाऊस?◼️ महाराष्ट्रातील बहुतांश भागात, विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात, नेहमीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.◼️ किनारी कोकण विभाग तसेच विदर्भातील काही भागांत तुलनेने पावसाचे वितरण चांगले राहू शकते.◼️ सरासरीपेक्षा कमी पावसाचा धोका असल्याने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो
एल निनो'चा प्रभाव◼️ प्रशांत महासागरामध्ये 'एल निनो' स्थिती सक्रिय होत असल्याने मान्सूनच्या पावसावर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची भीती आहे.◼️ यामुळे मान्सूनच्या उत्तरार्धात म्हणजे जुलै ते सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण अधिक कमी राहू शकते.
दिलासादायक बाब काय?◼️ डॉ. मोहपात्रा यांनी सांगितले की, मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) हिंदी महासागरात 'पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल' स्थिती निर्माण होऊ शकते.◼️ ही स्थिती मान्सूनसाठी पोषक असते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होऊन 'एल निनोचा प्रभाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
शेतीवर काय परिणाम?◼️ देशातील अन्नधान्य उत्पादनाचे प्रमुख क्षेत्र असलेल्या मध्य व उत्तर-पश्चिम भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाचा धोका आहे.◼️ ज्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.◼️ शेतकऱ्यांनी खरीप पेरणी करताना मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होणाऱ्या सुधारित अंदाजाची वाट पाहावी.
अधिक वाचा: रेशनकार्डवरील रॉकेल वाटपाचा दर ठरला; प्रतिलिटर किती रुपयाने मिळणार रॉकेल?
Web Summary : India Meteorological Department forecasts below-average monsoon rains this year, potentially impacting agriculture, especially in Marathwada and central Maharashtra. 'El Nino' could worsen conditions, though a positive Indian Ocean Dipole might offer some relief in the later season. Farmers should await updated forecasts before planting.
Web Summary : भारतीय मौसम विभाग ने इस साल मानसून की बारिश औसत से कम रहने का अनुमान जताया है, जिससे कृषि प्रभावित हो सकती है, खासकर मराठवाड़ा और मध्य महाराष्ट्र में। 'एल नीनो' स्थिति को और खराब कर सकता है, हालांकि हिंद महासागर द्विध्रुव से कुछ राहत मिल सकती है। किसानों को बुवाई से पहले अपडेट का इंतजार करना चाहिए।