Join us

चांदोली धरण ८७.८० टक्के भरले; धरणातील आवक ७८१४ क्युसेकने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 16:17 IST

Chandoli Dam Water Update : शिराळा तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. चांदोली धरण ८७.८० टक्के भरले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणातील आवक ७८१४ क्युसेकने सुरू आहे.

सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. चांदोली धरण ८७.८० टक्के भरले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणातील आवक ७८१४ क्युसेकने सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा एक टीएमसीने वाढला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग बंद असल्याने नदीच्या पाणीपातळीत घट झाली आहे

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज, निवळे, धनगरवाडा, चांदोली येथे पाऊस सुरूच आहे. पाथरपुंज येथील पर्जन्यमापन यंत्रणा बंद आहे तर निवळे १२१, धनगरवाडा ९१, चांदोली ६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी एवढाच ३०.२० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

चांदोली धरणात ७ हजार ८१४ क्युसेकने आवक तर वीजनिर्मिती केंद्रातून व चार दरवाज्यातून नदीपात्रात विसर्ग बंद आहे. पावसामुळे वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलाव, अंत्री बुद्रूक तलाव, रेठरे धरण, मोरणा धरण, टाकवे तलाव, शिवणी तलाव तसेच सर्व ४९ पाझर तलाव भरले आहेत. पावसाच्या गेल्या पाच सहा दिवसांपासून पावसाच्या उघडीपीमुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत.

चांदोली पाणलोट क्षेत्रात चोवीस तासातील पाऊस (आकडे मि. मी. मध्ये)

पाथरपुंज - नोंद नाहीनिवळे - १२१ (३१०२)धनगरवाडा - ९१ (२४४९)चांदोली - ६७ (२२१४)

हेही वाचा : वहिवाट, शेतरस्ता होणार मोकळा होणार; शेतकऱ्यांना मोफत पोलिस बंदोबस्त देण्याबाबत गृह विभागाचा मोठा निर्णय

टॅग्स :सांगलीपाऊसपाणीनदीधरणसांगली पूरशेतकरी