शिराळा : शहरासह तालुक्यात पाऊस उन्हाचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तसेच धरण परिसरात अतिवृष्टी झाली आहे. चांदोली धरण ७२.४४ टक्के भरले आहे.
या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्र एक हजार पार झाला असून, मंगळवारी (दि. १) सायंकाळी ७ वाजता पाथरपुंज येथे दोन हजार पार झाले आहे.
कोकरुड-रेठरे बंधारा अजूनही पाण्याखाली आहे. आणखी अडीच टीएमसी पाणीसाठा वाढल्यावर चांदोली धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडणार आहेत.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज, निवळे, धनगरवाडा, चांदोली येथे एक हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. यावर्षी पाथरपुंजबरोबर निवळे येथे पावसाचे प्रमाण वाढले आहे.
तसेच बारावेळा अतिवृष्टी झाली आहे. गतवर्षी चांदोली धरणात ११.८४ टीएमसी पाणीसाठा होता तर यावर्षी २४.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
अधिक वाचा: उजनी व वीर धरणांमधून विसर्ग सुरूच; पंढरपुरात मंदिरांना पाण्याचा वेढा कायम