Join us

Bhama Askhed Dam : रब्बी हंगामातील पहिले आवर्तन भामा आसखेड धरणातून सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 11:35 IST

Bhama Askhed Dam भामा आसखेड धरणातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडले असून, सांडव्यातून १२०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून सध्या धरणात ७.६९ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली.

आसखेड : भामा आसखेड धरणातूनरब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडले असून, सांडव्यातून १२०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून सध्या धरणात ७.६९ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली.

धरणाच्या सांडव्याद्वारे बाराशे क्युसेकने पाण्याचा विसर्ग भामा नदीपात्रात सोडला. या आवर्तनाचा फायदा खेड, शिरूर, दौंड, हवेली या चार तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पिकांना होईल.

सोडलेल्या पाण्याने धरणापासून ते दौंड तालुक्यातील आलेगावपागापर्यंतचे भीमा व भामा नदीवरील एकूण १८ बंधारे भरणार असून, या पाण्याचा फायदा रब्बी पिकांसह पिण्याचे पाणी योजनांना होणार आहे. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन भामा आसखेड धरणातून सोडल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

यंदा १२९९ मिमी पाऊस- भामा आसखेड हे ८.१४ टीएमसी क्षमतेचे मातीचे धरण असून, सध्या धरणात ७.२१ टीएमसी म्हणजेच ९४.१५ टक्के पाणीसाठा (गतवर्षी ८८.०६ टक्के) आहे.- धरणातील पाण्याची पातळी ६७०.६६ मीटर असून, एकूण पाणीसाठा २१७.९४८ दलघमी आहे. तर धरणाचा उपयुक्त पाणीसाठा २०४.४२६ दलघमी आहे.- यंदा समाधानकारक म्हणजे १२९९ मिलिमीटर पावसाची नोंद धरण परिसरात झाली होती.- शेवटचा दौंड तालुक्यातील आलेगावपागा बंधारा भरल्यानंतर विसर्ग बंद केला जाईल, अशी माहिती भामा आसखेड धरण करंजविहिरे उपविभागाचे शाखा अभियंता नीलेश घारे दिली.

टॅग्स :धरणपाणीशेतीपाटबंधारे प्रकल्पपीकरब्बीशेतकरीनदी