Lokmat Agro >हवामान > धुळ्यातील १२ पैकी ८ प्रकल्प झालेत तुडुंब; पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरूच

धुळ्यातील १२ पैकी ८ प्रकल्प झालेत तुडुंब; पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरूच

8 out of 12 projects in Dhule have collapsed; Water discharge continues into the Panjra river basin | धुळ्यातील १२ पैकी ८ प्रकल्प झालेत तुडुंब; पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरूच

धुळ्यातील १२ पैकी ८ प्रकल्प झालेत तुडुंब; पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरूच

Dhule Water Update : यंदा जून महिन्यापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्हाभरात पावसाची प्रतिक्षा केली जात होती. परंतु गणेशोत्सवाच्या दहा दिवसात दररोज पाऊस झाल्याने धुळे जिल्ह्यातील १२ पैकी ८ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.

Dhule Water Update : यंदा जून महिन्यापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्हाभरात पावसाची प्रतिक्षा केली जात होती. परंतु गणेशोत्सवाच्या दहा दिवसात दररोज पाऊस झाल्याने धुळे जिल्ह्यातील १२ पैकी ८ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

यंदा जून महिन्यापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्हाभरात पावसाची प्रतिक्षा केली जात होती. परंतु गणेशोत्सवाच्या दहा दिवसात दररोज पाऊस झाल्याने धुळे जिल्ह्यातील १२ पैकी ८ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.

मान्सून काळात चार महिन्यात साक्री तालुका वगळता, शिंदखेडा, शिरपूर, धुळे शहरासह तालुक्यात कमी पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यापर्यंत १९० मिमी पाऊस झाला, पण ऑगस्ट महिन्यात २६३.५ मिमी पाऊस झाला. म्हणजेच यंदा धुळेकरांना बाप्पा पावला असेच म्हणावे लागेल.

पाणीप्रश्न सुटणार...

साक्री तालुक्यातील प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने धुळे शहराला पाणीपुरवठा करणारे प्रकल्पात मुबलक जलसाठा आहे. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे. तर शिंदखेडा तालुक्यात प्रकल्पात अद्याप ५० टक्केच आहेत.

साक्री तालुक्यात यंदा दमदार पाऊस...!

यंदा साक्री तालुक्यात यंदा दमदार पाऊस झाल्याने मालनगाव, जामखेली तसेच अक्कलपाडा धरण ओव्हरफ्लो झाले आहेत. अक्कपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात सलग चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. या जलसाठ्याने नदीकाठावरील अनेक गावांचा पाणीप्रश्न निकाली लागला आहे.

असा आहे प्रकल्पात साठा

पांझरा १००, मालनगाव १००, जामखेली १००, कनोली १००, बुराई १००, करवंद ८६, अनेर ७३, अक्कलपाडा ९१ टक्के पुर्ण क्षमतेने भरला आहे. तर सोनवद २७, अमरावती ५३, सुलवाडे ३९ तसेच वाडीशेवाडी धरणात अवघा ५८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान वाडीशेवाडी, सुलवाडे तसेच अमरावती या प्रकल्पात पुरेसा जलसाठ्याची गरज आहे.

मागील वर्षात जून ते ऑगस्टपर्यंतचा पाऊस

शहरात मागील वर्ष २०२४ मध्ये जून महिन्यात १२४.२ मिमी पावसाची सरासरी होती. त्यात ८ दिवस पाऊस होऊन २००८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर जुलैत १५३.४ मिमी पावसाची सरासरी होती. त्यात १३ दिवस पाऊस होऊन १९८.९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात १२६.१ मिमी पावसाची सरासरी होती. त्यात १२ दिवस पाऊस होऊन २३१.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

ऑगस्टपर्यंत पावसाची नोंद

शहरात यंदा जूनमध्ये १२४.२ मिमी पावसाची सरासरी होती. त्यात ६ दिवस पाऊस होऊन १२०.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर जुलैत १५३.४ मिमी पावसाची सरासरी होती. महिन्यात एकूण ६ दिवस ७०.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात १२६.१ मिमी पावसाची सरासरी आहे. त्यात महिन्यात गणेशोत्सवाचे १० दिवसात तब्बल २६३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : भेसळयुक्त दूध ओळखा घरच्या घरी; 'या' घरगुती चाचण्या करतील दूध भेसळीचा पर्दाफाश

Web Title: 8 out of 12 projects in Dhule have collapsed; Water discharge continues into the Panjra river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.