Join us

दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या 'या' जिल्ह्यातील ११० प्रकल्प १०० टक्के भरले; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 12:40 IST

यंदाच्या पावसाळ्याने मोठा दिलासा मिळाला असून ऑगस्ट अखेर राज्याच्या 'या' जिल्ह्यातील ११० प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. चार दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आले आहेत.

यंदाच्या पावसाळ्याने धाराशिव जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला असून ऑगस्ट अखेर ११० प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. चार दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आले आहेत. यामुळे परिसरातील शेती पिके पाण्यात गेली आहेत. यामुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून रब्बी हंगामातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आले आहेत. यामुळे काही ठिकाणी शेतीत पाणी साचले आहे. मात्र, प्रकल्पांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्याच्या प्रकल्पांमध्ये ७६ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला असून, यामुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील २२६ पैकी ११० प्रकल्प १०० टक्के भरले असून, १८ प्रकल्प ७५ टक्क्यांवर आहेत. यामुळे एकूण प्रकल्पांत ७२८ दलघमी म्हणजे ७६ टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे. यामुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या मोठ्या पाणीसाठयामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याची कोणतीही समस्या उद्भवणार नाही, अशी खात्री प्रशासनाने व्यक्त केली आहे.

यामुळे शेतीलाही मोठा फायदा होणार असून, रब्बी हंगामातील पिकांना पुरेसे पाणी मिळणार आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, अजूनही जिल्ह्यातील काही प्रकल्प कोरडे असून, ते दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रकल्पांमध्येही लवकरच पाणीसाठा वाढेल, अशी आशा पाटबंधारे विभागाने व्यक्त केली जात आहे.

१३ प्रकल्प जोत्याखाली...

धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे बहुतांश प्रकल्पांत पाणीसाठा झाला असून, ११० प्रकल्प भरले आहेत. मात्र, १३ लघुप्रकल्प अद्याप जोत्याखाली आहेत. आगामी काळात समाधानकारक पाऊस झाल्यास या प्रकल्पात पाणीसाठा होणार आहे.

प्रकल्पनिहाय उपयुक्त साठा (दलघमी)...

प्रकल्प दलघमी साठा टक्के 
मोठे ८९.३४८ १०० 
मध्यम २०५.५२२ ८९ 
लघू ४३३.९३४ ६४ 
एकूण ७२८.८०४३ ७६.३ 

प्रकल्पांतील साठा...

प्रकल्प १००%७५%५०%२५%
मोठे ०१ ०० ०० ०० 
मध्यम १२ ०२ ०२ ०१ 
लघू ९७ १६ ५५ ४० 
एकूण ११० १८ ५७ ४१ 

मांजरा, सीना कोळेगाव १०० टक्के...

• ऑगस्ट महिन्यात मध्यम व दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळेगावसह मांजरा धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.

• मांजरातून काही दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तेरणा मध्यम प्रकल्पातूनही विसर्ग सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आले आहेत.

गतवर्षाच्या तुलनेत ४१ टक्के अधिक साठा...

धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पात ऑगस्ट महिन्यातच ७६.०३ टक्के साठा झाला आहे. गतवर्षी ऑगस्ट महिनाअखेरला केवळ ३५.५४ टक्केच साठा होता. गतवर्षाच्या तुलनेत यंदा ऑगस्टअखेरला ४१ टक्के अधिक साठा झाला आहे. लहान-मोठ्या प्रकल्पांत बऱ्यापैकी जलसाठा झाल्याने खासकरून रबी हंगामासाठी याचा उपयोग होईल. यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

काही दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत आहे. यामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात साठा होत आहे. ऑगस्टमध्येच ११० पेक्षा अधिक प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. उर्वरित प्रकल्पांत साठा होण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. - अजित मदने, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग क्र. १ धाराशिव.

हेही वाचा : करटुले शेती का आहे शेतकऱ्यांसाठी नफा देणारी? जाणून घ्या संधी आणि फायदे

टॅग्स :धाराशिवपाणीमांजरा धरणमराठवाडाधरणनदीपाऊसशेती क्षेत्रशेतीशेतकरीजलवाहतूक