Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > दुय्यम स्वरूपाच्या अन्नद्रव्यात पिकांसाठी गंधक का द्यावे? काय आहेत फायदे? वाचा थोडक्यात

दुय्यम स्वरूपाच्या अन्नद्रव्यात पिकांसाठी गंधक का द्यावे? काय आहेत फायदे? वाचा थोडक्यात

Why should we provide sulfur to crops as a secondary nutrient? What are the benefits? Read in brief | दुय्यम स्वरूपाच्या अन्नद्रव्यात पिकांसाठी गंधक का द्यावे? काय आहेत फायदे? वाचा थोडक्यात

दुय्यम स्वरूपाच्या अन्नद्रव्यात पिकांसाठी गंधक का द्यावे? काय आहेत फायदे? वाचा थोडक्यात

गंधक हे नत्र, स्फुरद अन् पालाश या मुख्य अन्नद्रव्यानंतरचे दुय्यम स्वरूपाचे अन्नद्रव्य आहे.

गंधक हे नत्र, स्फुरद अन् पालाश या मुख्य अन्नद्रव्यानंतरचे दुय्यम स्वरूपाचे अन्नद्रव्य आहे.

गंधक हे नत्र, स्फुरद अन् पालाश या मुख्य अन्नद्रव्यानंतरचे दुय्यम स्वरूपाचे अन्नद्रव्य आहे. हे पिकांच्या वाढीसाठी तसेच फळे व भाजीपाला पिकांचा रंग, आकर्षकपणा, गुणवत्ता यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते.

गंधक या अन्नद्रव्याची कडधान्य, गळीतधान्य, तृणधान्ये, भाजीपाला, फळभाज्या, फुलझाडे, ऊस, कापूस, केळी, द्राक्षे या पिकामध्ये गरज असते.

या पिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या खतासोबत गंधक अन्नद्रव्य (सल्फर) वापरले तर १५ ते २५ टक्के उत्पादन वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

अमोनियम सल्फेट चांगले खत
◼️ तेलवर्गीय पिकामध्ये व विशेषतः भुईमूग पिकामध्ये खतांचा वापर करताना यासोबत गंधक युक्त खतांची मात्रा साधारणपणे २० ते ३० किलो प्रती हेक्टरी याप्रमाणे दिली तर ते खूप फायदेशीर ठरते.
◼️ याशिवाय सुपर फॉस्फेट आणि जिप्सम हे भुईमुगासाठी अतिशय चांगल्या प्रकारची खते आहेत.
◼️ कारण, भुईमूग या पिकांमध्ये शेंग तयार होण्यासाठी कॅल्शियमची खूपच आवश्यकता असते.
◼️ गंधकाची कमतरता दूर करण्यासाठी अमोनियम सल्फेट हे देखील चांगल्या प्रकारचे खत आहे.

अधिक वाचा: राज्यातील शेत जमिनींच्या पोट हिस्स्यांची मोजणी करून नवीन नकाशे येणार; शासन निर्णय जारी

Web Title : फसलों के लिए सल्फर: लाभ और यह क्यों जरूरी है, संक्षेप में

Web Summary : सल्फर, एक महत्वपूर्ण द्वितीयक पोषक तत्व, फसल की वृद्धि, रंग और गुणवत्ता को बढ़ाता है। विभिन्न फसलों के लिए आवश्यक, सल्फर युक्त उर्वरक उपज को 15-25% तक बढ़ाते हैं। अमोनियम सल्फेट फायदेमंद है, खासकर मूंगफली जैसी तिलहन फसलों के लिए, कैल्शियम अवशोषण को बढ़ाता है। सुपरफॉस्फेट और जिप्सम भी बेहतरीन विकल्प हैं।

Web Title : Sulfur for Crops: Benefits and Why It's Essential, Explained Briefly

Web Summary : Sulfur, a vital secondary nutrient, boosts crop growth, color, and quality. Essential for various crops, sulfur-containing fertilizers increase yields by 15-25%. Ammonium sulfate is beneficial, especially for oilseed crops like groundnut, enhancing calcium absorption. Superphosphate and gypsum are also excellent choices.