Lokmat Agro >स्मार्ट शेती > प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी कुठे कराल अर्ज ? वाचा सर्व माहिती

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी कुठे कराल अर्ज ? वाचा सर्व माहिती

Where to apply for the Prime Minister's Micro Food Processing Industry Scheme? Read all the information | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी कुठे कराल अर्ज ? वाचा सर्व माहिती

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी कुठे कराल अर्ज ? वाचा सर्व माहिती

PMFME Scheme : सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा आधार घेऊन आपल्या परिसरात जिल्ह्यात ज्या शेतमालाचे सर्वाधिक उत्पादन असेल त्यानुसार सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेऊन उद्योग उद्योग उभारता येतो.

PMFME Scheme : सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा आधार घेऊन आपल्या परिसरात जिल्ह्यात ज्या शेतमालाचे सर्वाधिक उत्पादन असेल त्यानुसार सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेऊन उद्योग उद्योग उभारता येतो.

शेअर :

Join us
Join usNext

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा आधार घेऊन आपल्या परिसरात जिल्ह्यात ज्या शेतमालाचे सर्वाधिक उत्पादन असेल त्यानुसार सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेऊन उद्योग उद्योग उभारता येतो.

यासाठी अर्ज कुठे करायचा ? पात्रता काय आहे ? अनुदान किती आहे ? या सर्वांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

योजनेचा उद्देश

१. सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट/संस्था/कंपनी, स्वयं सहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था यांची पतमर्यादा वाढविणे.

२. उत्पादनांचे ग्रॅन्डींग व विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे.

३. महाराष्ट्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्या साठी सहाय्य करणे.

४. सामाईक सेवा जसे की साठवणुक, प्रक्रिया सुविधा, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे.

५. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे.

६. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे.

समाविष्ट जिल्हे

महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्हे (मुंबई शहर व मुंबई उपनगर समाविष्ट)

पात्र प्रकल्प

• एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) नविन तसेच कार्यरत सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग.

• एक जिल्हा एक उत्पादन व्यतिरिक्त (NON ODOP) नविन प्रक्रिया उद्यद्योग व कार्यरत उद्योगांचे विस्तारीकरण व स्तर वृध्दी करणे.

फळे, भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्य तेलबिया, मसाला पिके, दुग्ध व किरकोळ उत्पादने, बेकरी तसेच स्नॅक्स आधारीत उत्पादने.

पात्र लाभार्थी

वैयक्तिक लाभ : वैयक्तिक मालकी/भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) शेतकरी उत्पादन कंपणी सहकारी संस्था स्वयं सहाय्यता गट (SHG) गैर सरकारी संस्था (NGO), खाजगी कंपणी (Pvt. Ltd. Companies) इत्यादी.

गट लाभ : शेतकरी उत्पादक संस्था / शेतकरी उत्पादक कंपणी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन (उदा. MSRLM-CLF, MAVIM- VLF, CMRC, NULM-ALF), शासकीय संस्था.

लाभार्थी निवडचे निकष

वैयक्तिक लाभ

१) उद्योगामध्ये १० पेक्षा कमी कामगार कार्यरत असावेत.

२) अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पेक्षा जास्त असावे.

३) एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल.

४) सदर उद्योगाला औपचारीक दर्जा प्राप्त करुन देण्याची तयारी असावी.

५) पात्र प्रकल्प किंमतीच्या किमान १० टक्के लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरीत बँक कर्ज मुदत घेण्याची तयारी असावी.

गट लाभार्थी

१) ODOP तसेच ODOP साठीचे प्रस्ताव सहाय्यासाठी पात्र.

२) वार्षिक उत्पादन व अनुभवाची अट नाही.

३) पात्र प्रकल्प किमतीच्या किमान १० टक्के प्रवर्तकाचे योगदान.

४) पात्र प्रकल्प खर्चा मध्ये जमीन / भाडे किंवा भाडे तत्वावरील कामाच्या शेडची, किमंत समाविष्ट नाहीत.

५) पात्र प्रकल्प खर्चामध्ये तांत्रिक नागरी काम ३० टक्के पेक्षा जास्त नसावे.

अर्थिक मापदंड

• वैयक्तिक लाभासाठी पात्र प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के व जास्तीतजास्त १० लाखापर्यंत बँक कर्जाच्या निगडीत अनुदान लाभ मार्केटिंग व ब्रडिंग साठी एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम कमाल निधी मर्यादा केंद्र शासना मार्फत विहीत करण्यात यईल.

• स्वयंसहाय्यता गटातील सदस्यांना बीज भाडल रु. ४०,०००/- प्रती सदस्य ग्रामिण व शहरी गटांसाठी सामाईक पायभूत सुविधा पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान कामाल सहाय्यमर्यादा ३ कोटी.

• मूल्य साखली पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान कमाल सहाय्य मर्यादा ३ कोटी क्षमता बांधणी प्रशिक्षण १०० टक्के अनुदान.

अर्ज करण्याची पध्दत

• वैयक्तिक लाभार्थी : www.pmfme.mofpi.gov.in या संकेत स्थाळावर ऑनलाईन अर्ज करावा.

• गट लाभार्थी : www pmfme.mofpi.gov.in या संकेत स्थळावर अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी संपर्क कार्यालय

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यांचे कार्यालय तसेच उपविभागीय कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी/मंडळ कृषी अधिकारी/कृषी पर्यवेक्षक/कृषी सहाय्यक व जिल्हा संसाधन व्यक्ती.

Web Title: Where to apply for the Prime Minister's Micro Food Processing Industry Scheme? Read all the information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.