Lokmat Agro >स्मार्ट शेती > यंदा रब्बी हंगामात 'या' सुधारित ज्वारी वाणांची लागवड ठरेल फायद्याची; हमी असेल अधिक उत्पादनाची

यंदा रब्बी हंगामात 'या' सुधारित ज्वारी वाणांची लागवड ठरेल फायद्याची; हमी असेल अधिक उत्पादनाची

This year, planting these improved sorghum varieties in the Rabi season will be beneficial; will guarantee higher production | यंदा रब्बी हंगामात 'या' सुधारित ज्वारी वाणांची लागवड ठरेल फायद्याची; हमी असेल अधिक उत्पादनाची

यंदा रब्बी हंगामात 'या' सुधारित ज्वारी वाणांची लागवड ठरेल फायद्याची; हमी असेल अधिक उत्पादनाची

Sorghum Farming : ज्वारी हे महाराष्ट्रातील पारंपरिक आणि अत्यंत महत्त्वाचे अन्नधान्य पीक मानले जाते. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हे पीक मुख्यत्वे रब्बी या हंगामात घेतले जाते. याकाळात हवामान कोरडे आणि थंड असल्याने ज्वारीच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होते. यामुळे ज्वारीचे उत्पादन अधिक गुणवत्तापूर्ण, टिकाऊ आणि स्वादिष्ट मिळते.

Sorghum Farming : ज्वारी हे महाराष्ट्रातील पारंपरिक आणि अत्यंत महत्त्वाचे अन्नधान्य पीक मानले जाते. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हे पीक मुख्यत्वे रब्बी या हंगामात घेतले जाते. याकाळात हवामान कोरडे आणि थंड असल्याने ज्वारीच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होते. यामुळे ज्वारीचे उत्पादन अधिक गुणवत्तापूर्ण, टिकाऊ आणि स्वादिष्ट मिळते.

शेअर :

Join us
Join usNext

ज्वारी हे महाराष्ट्रातील पारंपरिक आणि अत्यंत महत्त्वाचे अन्नधान्य पीक मानले जाते. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हे पीक मुख्यत्वे रब्बी या हंगामात घेतले जाते. याकाळात हवामान कोरडे आणि थंड असल्याने ज्वारीच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होते. यामुळे ज्वारीचे उत्पादन अधिक गुणवत्तापूर्ण, टिकाऊ आणि स्वादिष्ट मिळते.

रब्बी ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने मानवी आहारासाठी केला जातो. ग्रामीण भागात ज्वारीच्या भाकरीला पारंपरिक आणि पौष्टिक अन्न म्हणून महत्त्व आहे. याशिवाय ज्वारीच्या पिकातून मिळणारा कडबा (चारा) हा गुरांसाठी उत्तम आणि पोषणमूल्यपूर्ण खाद्यस्रोत ठरतो. त्यामुळे ज्वारी हे केवळ अन्नधान्य म्हणून नव्हे तर पशुखाद्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे पीक आहे.

आजच्या आधुनिक कृषी व्यवस्थेत बाजारात ज्वारीच्या असंख्य जाती आणि वाण उपलब्ध आहेत. मात्र सर्वच वाण हे शेतकऱ्यांच्या क्षेत्र, हवामान, जमिनीचा प्रकार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार योग्य ठरतात असे नाही. त्यामुळे वाण निवडताना संशोधन संस्थांनी व कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या आणि शासनाने शिफारस केलेल्या सुधारित जातींची निवड करणे अत्यंत आवश्यक ठरते.

या सुधारित जातींमध्ये विविध रोग व किडींपासून प्रतिकारशक्ती, कमी कालावधीत पक्वता, चांगली धान्य आणि कडबा उत्पादकता, तसेच प्रतिकूल हवामानातील सहनशीलता ही महत्त्वाची वैशिष्ट्ये असतात. काही जाती भाकरीसाठी योग्य असतात तर काही हुरडा, लाह्या किंवा कडब्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरतात. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गरजेनुसार आणि बाजाराच्या मागणीनुसार योग्य जातींची निवड करता येते.

सुधारित वाणांची लागवड केल्याने केवळ उत्पादनात वाढ होत नाही तर उत्पन्नातही लक्षणीय वाढ होते. कारण, दर्जेदार धान्याला बाजारात चांगला दर मिळतो. तसेच कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे कीडनाशकांवरील खर्च वाचतो. योग्य वाणाची निवड आणि शिफारशीनुसार लागवड केल्यास अपेक्षित उत्पादन मिळवणे शक्य होते. परिणामी, शेतकऱ्यांचे शेतीवरील विश्वास व आत्मभान अधिक बळकट होते.

लागवडीची शिफारस व तंत्रज्ञान

• लागवडीचा कालावधी : १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर.

पेरणीचे अंतर : ४५ ☓ १५ सें.मी.

• खोली : ०५ सें.मी. पर्यंत.

• रोपे : हेक्टरी सुमारे १.४८ लाख.

• बियाण्याचे प्रमाण : हेक्टरी १० किलो (२ चाड्याच्या पाभरीने असल्यास).

• बीजप्रक्रिया : प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम ३०० मेश गंधक, २५ ग्रॅम ऍझोटोबॅक्टर व पी.एस.बी. जिवाणूसंवर्धक, ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशी.

जमिनीच्या प्रकारानुसार शिफारस केलेले वाण

वाणाचे नाव

शिफारस व वैशिष्ट्ये

फुले यशोमती

हलक्या जमिनीसाठी, अवर्षण प्रवण भागात (२०२१ मध्ये प्रसारित). ११०-११५ दिवस. धान्य ०९-११ क्विंटल/हे., कडबा ४०-५० क्विंटल. भाकरी गोड आणि चवदार. खोडमाशी प्रतिकारक.

फुले अनुराधा

हलक्या जमिनीस योग्य. १०५-११० दिवस. धान्य ०८-१० क्विंटल, कडबा ३०-३५ क्विंटल. भाकरी व कडबा उत्तम.

फुले सुचित्रा

मध्यम जमिनीसाठी, अवर्षण भागात. १२०-१२५ दिवस. धान्य २४-२८ क्विंटल, कडबा ६०-६५ क्विंटल. दाणे शुभ्र व मोत्यासारखे. रोगप्रतिरोधक.

परभणी मोती

भारी जमिनीसाठी, मराठवाड्यात शिफारस. १२०-१२५ दिवस. धान्य १८-२० क्विंटल, कडबा ६५-७५ क्विंटल. दाणे टपोरे.

परभणी सुपर मोती

(२०१९ मध्ये प्रसारित) ११८-१२० दिवस. धान्य ३२ क्विंटल.

परभणी शक्ती

(२०१९ मध्ये प्रसारित) ११८-१२० दिवस. धान्य २१-२४ क्विंटल, कडबा ४५-६५ क्विंटल. भारी जमिनीसाठी योग्य.

परभणी ज्योती

(२००६ मध्ये प्रसारित) १२५-१३० दिवस. धान्य ३८-४० क्विंटल, कडबा ८८-९० क्विंटल. उंच वाढणारा पण न लोळणारा. ओलिताखाली योग्य. मावा प्रतिकारक.

फुले वसुधा

भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायतीसाठी योग्य. ११६-१२० दिवस. धान्य २५-२८ क्विंटल, कडबा ५५-६० क्विंटल.

फुले मधुर

हुरड्यासाठी. मध्यम ते भारी जमीन. ९५-१०० दिवस. हुरडा ३०-३५ क्विंटल. चवदार व पचणारा.

फुले पंचमी

लाह्यांसाठी. मध्यम ते भारी जमिनीसाठी योग्य. ११५-१२० दिवस. लाह्या ८७.४% प्रमाणात. धान्य १२-१४ क्विंटल.

फुले रेवती

बागायती, भारी जमिनीसाठी. ११८-१२० दिवस. धान्य ४०-४५ क्विंटल, कडबा ९०-१०० क्विंटल. दाणे मोत्यासारखे शुभ्र. खोडमाशी प्रतिकारक.

रब्बी ज्वारीचे योग्य नियोजन व योग्य वाणांची निवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. कृषी विद्यापीठ व संशोधन संस्थांनी विकसित केलेल्या जातींचा लाभ घेणे ही काळाची गरज आहे.

प्रा. संजय बडे,
प्रा. के. एच शिरगापुरे

सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग,
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर.

हेही वाचा : सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

Web Title: This year, planting these improved sorghum varieties in the Rabi season will be beneficial; will guarantee higher production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.