Lokmat Agro >स्मार्ट शेती > डाळिंबांच्या या जातींनी महाराष्ट्राच्या फलोत्पादन क्षेत्रात केली क्रांती; वाचा सविस्तर

डाळिंबांच्या या जातींनी महाराष्ट्राच्या फलोत्पादन क्षेत्रात केली क्रांती; वाचा सविस्तर

These pomegranate varieties revolutionized Maharashtra's horticulture sector; Read in detail | डाळिंबांच्या या जातींनी महाराष्ट्राच्या फलोत्पादन क्षेत्रात केली क्रांती; वाचा सविस्तर

डाळिंबांच्या या जातींनी महाराष्ट्राच्या फलोत्पादन क्षेत्रात केली क्रांती; वाचा सविस्तर

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या डाळिंबाच्या गणेश, जी-१३७, मृदुला, फुले आरक्ता, भगवा आणि फुले भगवा सुपर या निर्यातक्षम वाणांबरोबर विविध बाबींवरील शिफारशींमुळे या फळपिकाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यात मोठी क्रांती झालेली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या डाळिंबाच्या गणेश, जी-१३७, मृदुला, फुले आरक्ता, भगवा आणि फुले भगवा सुपर या निर्यातक्षम वाणांबरोबर विविध बाबींवरील शिफारशींमुळे या फळपिकाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यात मोठी क्रांती झालेली आहे.

१) गणेश
-
डाळिंबाचे अनेक वाण असले तरी स्व. डॉ. चिमा यांच्या प्रयत्नाने फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथे विकसित झालेली गणेश हा वाण सर्वोत्तम आहे.
- या वाणाची फळे आकाराने मध्यम असून बिया मऊ असतात.
- दाण्याचा रंग फिकट गुलाबी असून चव गोड असते.

२) जी. १३७
-
हा वाण गणेश जातीतुन निवड पध्दतीने महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेला आहे.
- या फळाचे दाणे मऊ आहेत व रंग गणेश जाती पेक्षा किंचित गडद आहे.
- दाण्याचा आकार व गोडी गणेश पेक्षा सरस आहे.

३) मृदला
-
हा वाण गणेश व गुल ए शाह रेड या वाणांच्या संकरित पिढीपासून निवड पध्दतीने महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केला आहे.
- या वाणाची फळे आकाराने मध्यम ३०० ते ३५० ग्रॅम वजनाची असून फळांचा रंग व दाण्याचा रंग गडद लाल असतो.
- बी अतिशय मऊ असून दाण्यांचा आकार मोठा आहे.
- फळांची गोडी गणेश जातीच्या फळांसारखीच आहे.
- फळांचा पृष्ठभाग गडद लाल व चमकदार असतो.

४) फुले आरक्ता
-
हा वाण गणेश व गुल ए शाह रेड या वाणाच्या संकरित पिढीपासून निवड पध्दतीने महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केली आहे.
- फळांचा मोठा आकार, गोड टपोरे, मऊ आणि आकर्षक दाणे.
- फळांची साल चमकदार आणि गडद लाल रंगाची आहे.

५) भगवा
-
हा वाण अधिक उत्पादनक्षम असून फळांमध्ये गुणवत्तेचे अपेक्षित घटक असल्याचे आढळुन आले आहे.
- या वाणाची फळे १८० ते १९० दिवसांमध्ये परिपक्व होतात.
- फळांचा आकार मोठा, गोड टपोरे आणि आकर्षक दाणे, तसेच चमकदार.
- आकर्षक रंगाची जाड साल असलेली फळे दूरवरच्या बाजारपेठांसाठी उपयुक्त आहेत.
- इतर वाणांच्या तुलनेत हा वाण फळांवरील काळ्या ठिपक्या रोगांसाठी तसेच फुलकिडीस कमी बळी पडणारा आहे.
- या सर्व बाबीमुळे भगवा वाणाची महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादन घेणाऱ्या भागांमध्ये लागवडीस शिफारस करण्यात आली आहे.

६) फुले भगवा सुपर
-
हा वाण भगवा वाणांमधील निवड पध्दतीने विकसित केला असून तो अधिक उत्पादनक्षम व गुणवत्तेचे दर्शक आहे.
- या वाणाची फळे १७६ ते १८० दिवसात परिपक्व होतात.
- फळांचा रंग गर्द केशरी, आकार मध्यम, सरासरी वजन २७१ ते २९९ ग्रॅम.
- चव गोड व मऊ दाणे असून रसाचे प्रमाण जास्त आहे.

अधिक वाचा: Amba Falgal : आंबा पिकातील फळगळ रोखण्यासाठी करा हे सोपे उपाय

Web Title: These pomegranate varieties revolutionized Maharashtra's horticulture sector; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.