Lokmat Agro >स्मार्ट शेती > आता वाढेल एकरी पेरूचे उत्पन्न; यंदा अति सघन पद्धतीने अशी करा पेरूची लागवड

आता वाढेल एकरी पेरूचे उत्पन्न; यंदा अति सघन पद्धतीने अशी करा पेरूची लागवड

The yield of guava per acre will increase now; Plant guava in ati sanghan type this year | आता वाढेल एकरी पेरूचे उत्पन्न; यंदा अति सघन पद्धतीने अशी करा पेरूची लागवड

आता वाढेल एकरी पेरूचे उत्पन्न; यंदा अति सघन पद्धतीने अशी करा पेरूची लागवड

पेरूची अति संघन लागवड पद्धत 

पेरूची अति संघन लागवड पद्धत 

शेअर :

Join us
Join usNext

जगात साठ पेक्षाही अधिक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारात पेरू या फळाचा वापर केला जातो. पेरूच्या उत्पादक  देशांमध्ये भारत, ब्राझील, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, केनिया, सयुक्त राष्ट्र अमेरिका आणि पाकिस्तान हे राष्ट्र अग्रस्थानी आहेत. भारतात पेरू उत्पादन जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये घेतले जाते.

परंतु महाराष्ट्र,बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल, पंजाब व तामिळनाडू असे मुख्य उत्पादक राज्य आहेत.

फळांच्या पूर्ण उत्पादनात पेरूचे स्थान चौथ्या क्रमांकावर  आहे. देशात पेरू लागवड जवळपास १८२ हजार हेक्टर क्षेत्रावर केले जाते त्यामधून १८.२३ मिलियन टन पेरूचे उत्पादन प्राप्त होते. क्षेत्रफळ व उत्पादनात महाराष्ट्र हे राज्य अग्रस्थानी आहे बिहार व उत्तर प्रदेश हे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत, परंतु उत्पादनाच्या दृष्टीने कर्नाटक हे राज्य अग्रस्थानी आहे.

यानंतर पंजाब, बंगाल व गुजरात राज्य आहे. लक्षात घेता असे दिसून येते की क्षेत्रफळाच्या  दृष्टीने जेवढे उत्पन्न आले पाहिजे तेवढे उत्पन्न येत नाही.

यामुळे शेतकऱ्यांना पेरू लागवडीच्या नवीन पद्धतींकडे वळले पाहिजे त्यामध्येच एक नवीन पद्धत म्हणजेच पेरूची अति सघन लागवड यामध्ये दोन झाडातलं व दोन ओळीतलं अंतर कमी असते त्यामुळे कमी क्षेत्रफळात जास्त झाडांची लागवड करून आपण जास्त उत्पन्न घेऊ शकतो.

लागवड पद्धत

अतिसघन लागवडीमध्ये दोन ओळीतले अंतर २ मिटर व दोन झाडातले अंतर १ मीटर असे घेऊन प्रतिहेक्टर ५००० झाडांची लागवड आपण करू शकतो. यामध्ये एक खोडाचे झाड ४० ते ५० सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढू दिले जाते. लागवडी नंतर झाड व्यवस्थित सेट झाल्यावर ते जमिनीपासून ५० सेंटीमीटर अंतर सोडून पूर्ण झाड छाटून घेतले जाते, या छाटणी नंतर पंधरा ते वीस दिवसात त्याला नवीन फांद्या फुटायला सुरुवात होते.

या फांद्यांमधल्या फक्त तीन ते चार फांद्या राहू दिल्या जातात. तीन ते चार महिन्यानंतर परिपक्व झालेल्या या फांद्या परत पन्नास टक्के कापून घेतल्या जातात जेणेकरून पुन्हा एकदा नवीन फांद्या फुटतात. झाडांच्या फांद्या मजबूत आणि झाडाला व्यवस्थित आकार यावा यासाठी आपण ही छाटणी करत असतो.

या फांद्यांना चार महिने व्यवस्थित वाढू द्यावे त्यानंतर परत एकदा झाडाची उंची नियंत्रित राहावी म्हणून ५० टक्के परत एकदा या फांद्या छाटल्या जातात. आता पुढील ज्या नवीन फांद्या येतील त्या फांद्यांवर फुल लागायला सुरुवात होईल. ह्या पद्धती मध्ये झाडचा आकार लहान असू द्यावा लागतो म्हणून वारंवार छाटणी करणे गरजेचे आहे. एका वर्षांनंतर छाटणी एप्रिल च्या शेवटच्या आठवड्या पासून ते मे च्या दुसर्‍या आठवड्या पर्यंत केली जाते.

ह्या छाटणी नंतर ज्या नवीन फांद्या फुटतात त्या फांद्यांना फूल लागायला जून च्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात होते व फळधारणा ऑगस्ट महिन्यात होते.

बॅक प्रूनिंग

अति सघण पद्धतीमध्ये झाडाची ऊंची एक ते दीड मिटर पर्यंतच ठेवली जाते. झाडामध्ये फळ धारणा होणार्‍या भागांची वाढ होण्याकरिता झाडाची केनोपी म्हणजेच झाडाचा घेर व्यवस्थित नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. या पद्धतीत ६ ते ७ वर्षांनंतर जेव्हा फळ धारणा होणारे भाग कमी होत जातात तेव्हा संपूर्ण झाडाच्या ५० टक्के भाग छाटून टाकला जातो व परत वरील छाटणी प्रक्रिया केली जाते. 

खतांचे नियोजन

पेरुच्या अतिसघन बागेत वापरल्या जाणार्‍या खतांची मात्र झाडांचे वय, जमिनीचा व मातीचा प्रकार यावर अवलंबून असते. चांगल्या दर्जाचे फळ प्राप्त करण्यासाठी खालील पद्धतीने खातांचे व्यवस्थापन आपण करू शकतो.

नत्र:स्पुरद:पालाष (N:P:K) = ३५०:२४०:२०० ग्राम/झाड

झाडामध्ये बोरॉन व जिंक ची कमी दिसल्यास जिंक सल्फेट (०.३-०.५%) व बोरेक्स (०.५%) यांची फवारणी करावी.

खाली दिलेली मात्र फर्टीगेशनने द्यावी.

महिना

१६:४६:०० (डीएपी)

४६:००:०० (युरिया)

००:००:५० (एसओपी)

पाणी (लिटर/झाड)

जानेवारी

३३०.०८

फेब्रुवारी

१२५.०

३४७.७९

मार्च

१२५.०

१००.०

४७८.४५

एप्रिल

७४३.७२

मे

१५०.०

९३२.७८

जून

१२५.०

१५०.०

जुलै

ओगस्ट

सप्टेंबर

१५०.०

२००.०

ओक्टोंबर

१२५.०

१२५.०

१५०.०

६०७.९०

नोव्हेंबर

४९२.१३

डिसेंबर

३११.५८

एकूण

५२५.०

६००.०

४००.०

४२४४.४४

या पद्धतीने पेरु बागेची अति सघन लागवड केल्याने आपण कमी क्षेत्रात जास्त झाडांची लागवड करून आपण जास्त उत्पन्न घेऊ शकतो.

Source : अमृद उत्पादन की नवीन तकनिक, ( Dr. V. K. Singh, et al. केंद्रीय उपोष्णकटिबंधीय फलोत्पादन संस्था, लखनऊ.)

लेखक 
प्रा. वैभव कापडणीस

सहाय्यक प्राध्यापक, फलोत्पादन विभाग, उद्यानविद्या महाविद्यालय, मालेगाव. मो. नं. - ९६६५३३८१६६.

Web Title: The yield of guava per acre will increase now; Plant guava in ati sanghan type this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.