राज्यातील फळे आणि भाजीपाल्याला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यासाठी फळबागांची नोंदणी अपेडाकडे करणे अत्यंत महत्वाचे आहे.
मात्र, बदलत्या जागतिक निकषांमुळे आणि ग्राहकांच्या आरोग्याप्रती वाढलेल्या जागरूकतेमुळे आता प्रत्येक निर्यातक्षम बागेची नोंदणी असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या देशात होते निर्यात◼️ शेतमाल बहरीन, कुवेत, इराक, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, दुबई, युरोप, अमेरिका, नेदरलँड, बांगलादेश, थायलंड, केनिया, पोलंड, इटली, चीन आणि मलेशिया सारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.◼️ केळी, आंबा, डाळींब, द्राक्षे, भात, मिरची, फुले, वाटाणा, हळद, बेबी कॉर्नच्या, भाजीपाला आदी शेतमालाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते.
बागांची तपासणी◼️ नोंदणीनंतर कृषी विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष फळबागांना भेटी देतील. यावेळी बागेची स्थिती, कीड व्यवस्थापन आणि वापरली जाणारी खते यांची पाहणी केली जाईल.◼️ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पीक घेतले जात असल्याची खात्री पटल्यावरच निर्यातीचे प्रमाणपत्र दिले जाईल.
उर्वरित अंश नमुन्याचा अहवाल◼️ निर्यात करणाऱ्या फळे, भाजीपालामध्ये उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता नमुना घेतल्यानंतर त्यांची प्रपत्र पाचमध्ये नोंद होते.◼️ यादीप्रमाणे तपासणी करून त्याचा शेतकरी, बागनिहाय अहवाल ऑनलाइन प्रसिद्ध केला जातो.◼️ हा अहवाल शेतकऱ्यांना स्वतः डाउनलोड करण्याच्या सुविधा Apeda अपेडाच्या वेबसाइटवर दिलेल्या आहेत.◼️ त्याकरिता शेतकऱ्यांनी त्यांच्या बागेचा नोंदणी क्रमांक आणि बागेचा प्रपत्र चार 'ब' चा क्रमांक टाकल्यानंतर त्यांना त्यांच्या बागेचा उर्वरित अंश तपासणी अहवाल डाऊनलोड करून घेता येतो.
कुठे आणि कशी करायची नोंदणी?◼️ परदेशात माल पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना आता 'अपेडा' आणि कृषी विभागाच्या पोर्टलवर आपल्या फळबागांची नोंदणी करणे बंधनकारक आहे.◼️ निर्यातीला अधिक शिस्त लागून भारतीय कृषी मालाची विश्वासार्हता वाढणार आहे◼️ शेतकऱ्यांना स्वतः ऑनलाइनद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करता यावी यासाठी अपेडामार्फत 'फार्म रजिस्ट्रेशन' हे मोबाइल अॅप विकसित केले आहे.◼️ शेतकरी तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत ही ऑनलाईन निर्यातक्षम पिकांची नोंदणी करु शकतात.
अधिक वाचा: घरबसल्या मिळवा आता दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज; केंद्र सरकारने सुरु केले 'हे' नवे पोर्टल
Web Summary : Register orchards with Apeda for global fruit & vegetable exports. Key export destinations include Gulf countries, Europe, and America. Registration, inspection, and residue reports are mandatory. Register via Apeda's app or agricultural officer.
Web Summary : वैश्विक फल और सब्जी निर्यात के लिए एपीडा के साथ बागों का पंजीकरण करें। प्रमुख निर्यात गंतव्यों में खाड़ी देश, यूरोप और अमेरिका शामिल हैं। पंजीकरण, निरीक्षण और अवशेष रिपोर्ट अनिवार्य हैं। एपीडा के ऐप या कृषि अधिकारी के माध्यम से पंजीकरण करें।