Shankha Snail Management : संत्रा आणि मोसंबी बागायतदारांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. शंखी गोगलगायी नावाच्या किडीने बागांवर धाड टाकली असून पाने फस्त करत उत्पादनावर परिणाम करत आहे. या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. (Shankha Snail Management)
संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या एक नवीन आणि गंभीर आव्हान उभे राहिले आहे. शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव. (Shankha Snail Management)
मागील काही दिवसांत या किडीने झाडांवरील पाने फस्त करत मोठं नुकसान केलं असून उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. या संकटात शेतकऱ्यांना योग्य वेळी उपाययोजना करणं अत्यंत गरजेचे आहे.(Shankha Snail Management)
काटोल तालुक्यातील ढवळापूर, ब्रह्मपुरी, पारडी (गोतमारे) या भागातील किमान २५० एकरात शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव आहे. (Shankha Snail Management)
शंखी गोगलगायी म्हणजे काय?
शंखासारख्या कवचात राहणाऱ्या या गोगलगायी रात्री किंवा आर्द्र हवामानात सक्रिय होतात. या किडी झाडांच्या खोडांची साल, मुळं आणि पाने खाऊन झाडाचे पोषणक्षमता कमी करतात, परिणामी फुलं व फळं धोक्यात येतात.
लक्षणे कशी ओळखावीत?
* झाडांच्या खोडांवर किंवा पानांवर गोगलगायी सरकलेली दिसते
* पाने कुरतडलेली, खाल्लेली
* खोडांवर चकचकीत लाळसर चिकटसर रेषा
* झाडांची वाढ खुंटलेली
प्रभावी उपाययोजना
* शेतात स्वच्छता ठेवा : झाडांभोवती साचलेला पालापाचोळा, वाळकी झाडे-फांद्या, गवत यांची नियमित सफाई करा.
या कीडींना लपण्यासाठी जागा मिळू नये यासाठी जमिनीचा पोत ढवळून ठेवा.
* हाताने संकलन : सकाळी किंवा सायंकाळी शंखी गोगलगायी हाताने गोळा करून मीठपाण्यात टाकून नष्ट करा.
औषध फवारणी
खालीलपैकी एक उपाय फवारणीचा वापर करावा
तंबाखू अर्क व कॉपर सल्फेट
मोरचूद + चुना + कॉपर सल्फेट
कॉपर ऑक्सिक्लोराइड
मेटाल्डिहाइड / स्नेल किल
आयर्न फॉस्फेट / स्पिनोसॅड
इतर उपाय
झाडांना बोर्डोपेस्ट लावावी किंवा बोर्डो मिश्रण फवारावे
शेताचे धुरे नियमितपणे स्वच्छ ठेवावे
फवारणीनंतर लहान मुले आणि जनावरे झाडांच्या संपर्कात येऊ नये, याची काळजी घ्यावी.
तज्ज्ञ काय सांगतात?
शेताचे धुरे साफ करून शंखी गोगलगायींना लपून राहण्यासाठी जागा मिळू नये तसेच फवारणीनंतर या झाडांच्या संपर्कात इतर प्राणी अथवा लहान मुले येणार नाही, याची काळजी घ्यावी. - डॉ. प्रदीप दवणे, कीटकशास्त्रज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
हे ही वाचा सविस्तर : Krushi Salla : पिकं जपायची आहेत? मग वाचा विद्यापीठाचा फायदेशीर सल्ला