Micro Irrigation : शेतकऱ्यांच्या पाण्याच्या अडचणी दूर करत उत्पादन वाढवण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या 'प्रति थेंब अधिक पीक' (More Crop per Drop) सूक्ष्म सिंचन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. (Micro Irrigation)
पाणी वाचवा; उत्पादन वाढवा! 'प्रति थेंब अधिक पीक' योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आता सूक्ष्म सिंचनासाठी (Micro Irrigation) मिळणार आहे ९०% पर्यंत अनुदान. थेट खात्यात पैसे, अर्ज प्रक्रिया ऑनलाईन, आणि फक्त ५ हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी. तुमचा शेत समृद्ध करा, अर्ज करा आजच. (Micro Irrigation)
योजनेत अनुसूचित जाती (SC) व जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात असून, इतर पात्र शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.(Micro Irrigation)
काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये
* सूक्ष्म सिंचनासाठी २५% ते ९०% पर्यंत अनुदान
* भूधारक शेतकऱ्यांना ५५% व बहुभूधारकांना ४५% अनुदान
* मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत २५% ते ३०% पूरक अनुदान
* अनुसूचित जातींसाठी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
* अनुसूचित जमातींसाठी : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
५ हेक्टरपर्यंत शेतजमिनीच्या क्षेत्रासाठी योजनेचा लाभ
अर्ज प्रक्रिया व निवड कशी होते?
* अर्जदारांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे.
* निवड संगणकीकृत लॉटरी पद्धतीने केली जाते.
* निवड झालेल्या शेतकऱ्यांना SMS द्वारे सूचना दिल्या जातात.
* नंतर शेतकऱ्यांनी अधिकृत वितरकाकडून संच खरेदी करावा लागतो.
* कृषी पर्यवेक्षकांच्या पाहणीअंती अनुदान थेट बँक खात्यात जमा होते.
खर्च किती?
* भाजीपाला पिकांसाठी तसेच पिकाच्या प्रकार व लॅटरल अंतरानुसार खर्च वेगवेगळा असतो.
* सर्वसामान्यपणे प्रति हेक्टर ६ ते १० लाख रुपयांपर्यंतचा खर्च मान्य केला जातो.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
* सातबारा उतारा व ८ अ उतारा
* आधारकार्ड, बँक पासबुक, फार्मर आयडी
* सिंचन साधनांची नोंद सातबारावर आवश्यक
* नोंद नसल्यास स्वयंघोषणापत्र आवश्यक
शेतकऱ्यांसाठी सूचना
या योजनेतून पाणी बचत, खर्च कमी व उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
यासंदर्भात मार्गदर्शनासाठी जिल्हा कृषी अधिकारी, कृषी सहायक किंवा जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधावा.
अर्ज करण्यासाठी वेबसाइट :https://www.mahadbt.maharashtra.gov.in