Lokmat Agro >स्मार्ट शेती > उन्हाळ्यात ऊस पिकाला पाणी कमी पडतंय? करा ह्या उपाययोजना

उन्हाळ्यात ऊस पिकाला पाणी कमी पडतंय? करा ह्या उपाययोजना

Is sugarcane crop facing water shortage in summer? Take these measures | उन्हाळ्यात ऊस पिकाला पाणी कमी पडतंय? करा ह्या उपाययोजना

उन्हाळ्यात ऊस पिकाला पाणी कमी पडतंय? करा ह्या उपाययोजना

ऊस हे उष्ण कटीबंधातील पीक असल्यामुळे त्यास उष्ण हवामान, २० ते ३० सें. तापमान, ८०-९० % आर्द्रता, प्रखर सूर्यप्रकाश, पुरेसे पाणी पोषक असते.

ऊस हे उष्ण कटीबंधातील पीक असल्यामुळे त्यास उष्ण हवामान, २० ते ३० सें. तापमान, ८०-९० % आर्द्रता, प्रखर सूर्यप्रकाश, पुरेसे पाणी पोषक असते.

शेअर :

Join us
Join usNext

ऊस हे उष्ण कटीबंधातील पीक असल्यामुळे त्यास उष्ण हवामान, २० ते ३० सें. तापमान, ८०-९० % आर्द्रता, प्रखर सूर्यप्रकाश, पुरेसे पाणी पोषक असते.

तथापी कडक उन्हाळा, तसेच पाऊस काळातील कमी/नगण्य पाऊसमान यामुळे ऊस पिक वाढीवर अनिष्ठ परिणाम होवू शकतो.

पिकाच्या काही महत्वाच्या शरीरक्रियाशास्त्रीय व जीवरासायनिक क्रियांवर परिणाम होवून बाष्पीभवनाचा वेग वाढतो व पेशी अंतर्गत पाण्याचा ताण निर्माण होतो तर उत्पादनात १५ ते ५० टक्के इतकी लक्षणीय घट येते.

उसावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

  • ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पाणी व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करावा.
  • को ८६०३२, फुले ०२६५ व फुले १०००१, फुले ११०८२ आणि फुले ऊस १५०१२ हे ताण सहन करणारे वाण लागवडीसाठी वापरावेत.
  • पाचट आच्छादनाचा वापर करून सरी आड सरीतुन पाणी द्यावे.
  • पाण्याचा ताण पडल्यास लागणीनंतर ६०, १२० उराणि १८० दिवसांनी २ % म्युरेट ऑफ पोटॅश व २% युरीया (२०० ग्रॅम १० लिटर पाण्यात) यांचे मिश्रण करुन पिकावर फवारणी करावी.
  • ऊस पीक तणविरहीत ठेवावे त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होवून ऊस वाढीसाठी उपयुक्त ठरेल.
  • शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत.
  • ज्या ठिकाणी पाचट वापरणे शक्य नाही त्या ठिकाणी आंतरमशागत ट्रॅक्टरच्या औजाराने करावी.

खोडवा उसासाठी पाणी नियोजन 
-
खोडवा व्यवस्थापनासाठी नेहमीच्या पध्दतीने २६ ते २८ पाण्याच्या पाळया लागतात.
- परंतु नवीन तंत्रामध्ये फक्त १२ ते १४ पाण्याच्या पाळ्या असल्या तरी खोडवा उसाचे चांगले उत्पादन मिळते.
- खोडवा उसासाठी दोन पाण्याच्या पाळयांतील अंतर नेहमीच्या पध्दतीपेक्षा दिडपटीने वाढवावे.
- पाचटाचा अच्छादनासाठी वापर केल्यामुळे ४० ते ४५ दिवस पाणी नसले तरी उसाचे पीक चांगले तग धरु शकते.
- त्यामुळे ही पध्दत ज्या भागात पाण्याचा जास्त तुटवडा आहे त्या भागांसाठी वरदानच ठरेल.

अधिक वाचा: उसाचे पाचट शेतात लवकर कुजण्यासाठी करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

Web Title: Is sugarcane crop facing water shortage in summer? Take these measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.