Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > उसाचे पाचट शेतात लवकर कुजण्यासाठी करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

उसाचे पाचट शेतात लवकर कुजण्यासाठी करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

Follow these simple steps to make sugarcane trash decompose quickly in the field | उसाचे पाचट शेतात लवकर कुजण्यासाठी करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

उसाचे पाचट शेतात लवकर कुजण्यासाठी करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

Us Pachat Vyavsthapan ऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो. पाचटाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास जमिनीच्या सुपीकता व सजीवतेसाठी उपयुक्त ठरते.

Us Pachat Vyavsthapan ऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो. पाचटाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास जमिनीच्या सुपीकता व सजीवतेसाठी उपयुक्त ठरते.

ऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो. पाचटाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास जमिनीच्या सुपीकता व सजीवतेसाठी उपयुक्त ठरते.

बहुतांश शेतकरी शेताच्या स्वच्छतेसाठी म्हणून पाचट जाळतात. पाचट हाताळण्यातील अडचणी, पाचटाने झाकले गेल्यास खोडव्याची उगवण कमी होणे आणि नंतर आंतरमशागतीमध्ये येणारे अडथळे यामुळे शेतकऱ्यांना पाचट जाळणे ही पारंपरिक पद्धती अधिक सोयीची वाटते

 मात्र, पाचटाचे आच्छादन जमिनीवर केल्यास होणारे फायदे यापेक्षा तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याचे संशोधनात आढळले आहेत.

शेतातील पाचट लवकर कुजत का नाही?
उसाच्या पाचटामधील कर्बःनत्र यांचे गुणोत्तर हे १२२:१ असे असते. यातील कर्बाचे प्रमाण अधिक असले तरी नत्राची उपलब्धता कमी असल्याने जिवाणूंना अधिक वेळ लागतो. कर्बामुळे जिवाणूंना उर्जा मिळते; तर नत्रापासून प्रथिने मिळतात. जिवाणूंच्या चांगल्या वाढीसाठी पिकांच्या अवशेषांतील कर्ब:नत्र गुणोत्तर २४:१ असे असावे. असे गुणोत्तर शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये असते. त्यामुळे त्यामध्ये जिवाणूंचे प्रमाण अधिक असते. 

शेतातील पाचट लवकर कुजण्यासाठी काय कराल?

  • पाचटाचा जितका जास्त पृष्ठभाग जिवाणूंच्या संपर्कात येतो, तितका प्रक्रियेचा वेग वाढतो. त्यासाठी पाचटाची कुट्टी करून घेतल्यास फायद्याचे ठरते. त्यासाठी ट्रॅक्टरचलित पाचट कुट्टी यंत्र अलीकडे बाजारात उपलब्ध आहे; तसेच लखनौ येथील भारतीय ऊस संशोधन केंद्राने तयार केलेले खोडवा व्यवस्थापन यंत्र सर्वोत्तम आहे.
  • पाचट अधूनमधून भिजवत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी स्प्रिंकलर लावल्यास काम सोपे होते.
  • पाचट कोरडे झाल्यास कुजवणाऱ्या जिवाणूंची क्रिया मंदावते.
  • पाचटाचे कर्ब:नत्र गुणोत्तर २४:१ च्या जवळ आणण्यासाठी उसाच्या पाचटातील नत्राचे प्रमाण वाढवले पाहिजे. त्यासाठी पाचटावर बाहेरून नत्र (युरिया) टाकावा.
  • पाचट कुजवण्याचा वेग वाढवण्यासाठी शेणखत व जिवाणू कल्चर वापरावे.
  • शेतातील पाचटाचा ढीग करून कुजवल्यास कमी वेळेत खत तयार होते. ढिगामध्ये तापमानवाढीसाठी वाव असतो. शेतातच कुजावायची असल्यास त्यास वेळ लागतो.
  • महिन्याआड पाचटाची उलटापालट करावी. जिवाणूंना आवश्यक ऑक्सिजन मिळतो. त्याचा फायदा होतो. 

अधिक वाचा: Khodwa Us : उसाचा खोडवा ठेवणार असाल तर ह्या ६ गोष्टी करू नका; वाचा सविस्तर

Web Title: Follow these simple steps to make sugarcane trash decompose quickly in the field