Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > फळझाडांबरोबर आता भाजीपाला पिकातही केले जातेय कलम; कसे होतात फायदे? वाचा सविस्तर

फळझाडांबरोबर आता भाजीपाला पिकातही केले जातेय कलम; कसे होतात फायदे? वाचा सविस्तर

Along with fruit trees, grafting is now also being done in vegetable crops; what are the benefits? Read in detail | फळझाडांबरोबर आता भाजीपाला पिकातही केले जातेय कलम; कसे होतात फायदे? वाचा सविस्तर

फळझाडांबरोबर आता भाजीपाला पिकातही केले जातेय कलम; कसे होतात फायदे? वाचा सविस्तर

vegetable grafting भाजीपाल्यामध्ये रोगराई वाढल्याने ही शेती करणे फार बिकट होते आहे. उत्पादन घटू लागले आहे. मालाची गुणवत्ता कमी झाली आहे. कलम तंत्रज्ञान फळझाडांमध्ये परंपरागत चालत आले आहे आणि बऱ्याच वर्षांपासून वापरातही आहे.

vegetable grafting भाजीपाल्यामध्ये रोगराई वाढल्याने ही शेती करणे फार बिकट होते आहे. उत्पादन घटू लागले आहे. मालाची गुणवत्ता कमी झाली आहे. कलम तंत्रज्ञान फळझाडांमध्ये परंपरागत चालत आले आहे आणि बऱ्याच वर्षांपासून वापरातही आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भाजीपाल्यामध्ये रोगराई वाढल्याने ही शेती करणे फार बिकट होते आहे. उत्पादन घटू लागले आहे. मालाची गुणवत्ता कमी झाली आहे. कलम तंत्रज्ञान फळझाडांमध्ये परंपरागत चालत आले आहे आणि बऱ्याच वर्षांपासून वापरातही आहे.

वाढीव उत्पादन, गुणवत्ता, प्रतिकूल वातावरणात टिकून राहण्यासाठी त्याचा फळझाडांना खूप फायदाही झाला आहे. आता हे कलम करण्याचे तंत्र भाजीपाला पिकातही आले आहे.

भाजीपाला कलम लागवडीचा हेतू
भाजीपाल्याच्या घटत चाललेल्या गुणवत्तेला जैविक आणि अजैविक ताण मुख्य कारणीभूत आहेत. जैविक ताणाला आवाक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांकडून रासायनिक औषधांचा वापर केला जातो. याने उत्पादन वाढते पण मनुष्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम होताना दिसत आहेत.

कलमाचे फायदे
◼️ भाजीपाल्यामध्ये मातीजनित रोगांचे प्रमाण जास्त आहे. रोगप्रवण क्षेत्रांमध्ये रोगप्रतिरोधक वाणांची लागवड उत्तम पर्याय आहे, पण कलम तंत्रज्ञानाने या रोगांना नियंत्रणात आणले जाऊ शकते.
◼️ यामध्ये वेलवर्गीय वंशावळीमध्ये (काकडी, भोपळा, कलिंगड) इ. आढळणारे फ्युजेरियम विल्ट आणि सोलानेसी (टोमॅटो, वांगी, मिरची इ.)
◼️ वंशावळीमधील बॅक्टेरिया विल्टसारखे मातीजनित रोग कलम तंत्रज्ञानाने नियंत्रणात येऊ शकतात.
◼️ उत्पादन वाढ, कमी किंवा जास्त तापमानवाढीचा ताण सहन करण्यासाठी मदत, रोग व जिवाणू प्रतिकारशक्तीत वाढ, पाणी आणि मूलद्रव्यांचे ग्रहण करण्याच्या क्षमतेत वाढ, क्षारयुक्त मातीसाठी सहनशीलता वाढ इ. लाभ आहेत.

भाजीपाला कलम तंत्रज्ञानामध्ये येणाऱ्या समस्या
◼️ भाजीपाला कलम तंत्रज्ञानामध्ये रूटस्टॉक व सायनच्या बियाणे लागवडीचे नियोजन योग्यवेळी करावे लागते.
◼️ कलम भरण्यासाठी नियंत्रित वातावरणाच्या पॉलिहाऊसची सुविधा आवश्यक असते.
◼️ कलम तंत्रज्ञानामुळे बीजजनित रोगांचा प्रसार होण्याचा धोका जास्त असतो.
◼️ त्यामुळे कलम करण्याचे काम पॉलिहाऊसमध्येच झाले पाहिजे.

भाजीपाला कलम तंत्रज्ञानाचे फायदे
◼️ मातीतून प्रादुर्भाव करणाऱ्या रोगांना ही रोपे प्रतिकारक्षम असतात.
◼️ कलम केलेले रोप सूत्रकृमींना बळी पडत नाही.
◼️ कलम तंत्रज्ञानामुळे फळांचा आकार, उत्पादन व गुणवत्ता सुधारते.
◼️ संबंधित पिकाला पाण्याचा ताण सहन करण्यासाठी फायदा होतो.
◼️ त्याचबरोबर पाण्याची कमी उपलब्धता असलेल्या ठिकाणी लागवड करणे शक्य असते.
◼️ कलमी भाजीपाला रोपांमध्ये पांढऱ्या मुळांची भरपूर वाढ होत असल्यामुळे मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा अधिक होतो.

संदर्भ: शेतकरी मासिक

अधिक वाचा: ऊस पिकात जेठा कोंब का मोडावा? त्याची योग्य वेळ कोणती व तो कसा मोडावा? वाचा सविस्तर

Web Title: Along with fruit trees, grafting is now also being done in vegetable crops; what are the benefits? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.