Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > पाणीपातळीत वाढ होणार असल्याने कोयना नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पाणीपातळीत वाढ होणार असल्याने कोयना नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Residents near the Koyna River basin are alerted as the water level will rise | पाणीपातळीत वाढ होणार असल्याने कोयना नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पाणीपातळीत वाढ होणार असल्याने कोयना नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची (रेड अलर्ट) शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त येव्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. 

भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची (रेड अलर्ट) शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त येव्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. 

आज दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजे पर्यंत कोयना धरणामध्ये एकूण ८६.१९ टीएमसी ८१.८४ % पाणीसाठा झाला आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची (रेड अलर्ट) शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त येव्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. 

सद्यस्थितीत सांडव्यावरून ४०,००० क्यूसेक्स विसर्ग चालू आहे. उद्या दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. सांडव्यावरून सोडणेत आलेल्या विसर्गात वाढ करून ५०,००० क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल. तर धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ५२,१०० क्युसेक्स असेल.

यांसह कोयना/कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Residents near the Koyna River basin are alerted as the water level will rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.