सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी ४१ क्विंटल डाळिंबाची आवक झाली होती.
मागील आठवड्यात डाळिंबाला सरासरी दर ९००० रुपये क्विंटल इतका मिळत होता.
त्यात वाढ होऊन बुधवारी हा दर १२ हजार रुपये इतका राहिला. त्यामुळे डाळिंबाच्या दरात तीन हजार रुपयाने वाढ झाली आहे.
चांगल्या प्रतीच्या मालाला प्रतिक्विंटल २३५०० रुपये इतका दर मिळाला आहे.
सांगोला, करमाळा, माढा, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ आदी भागातून आवक होत आहे.
अधिक वाचा: कर्जमाफीसाठी पुढील हलचाली सुरु; राज्य शासनाने बँकांकडून शेतकऱ्यांची 'ही' माहिती मागविली
