Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Cold Wave in Maharashtra : उत्तरेकडून वाहिले गार वारे; राज्यभर कडाक्याची थंडी वाचा सविस्तर

Cold Wave in Maharashtra : उत्तरेकडून वाहिले गार वारे; राज्यभर कडाक्याची थंडी वाचा सविस्तर

latest news Cold wave in Maharashtra: Cold winds blew from the north; Severe cold across the state Read in detail | Cold Wave in Maharashtra : उत्तरेकडून वाहिले गार वारे; राज्यभर कडाक्याची थंडी वाचा सविस्तर

Cold Wave in Maharashtra : उत्तरेकडून वाहिले गार वारे; राज्यभर कडाक्याची थंडी वाचा सविस्तर

Cold wave in Maharashtra : उत्तरेकडून वाहणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात कडाक्याची थंडी वाढली असून, किमान तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. काश्मीर व उत्तर भारतातील थंडीचा थेट परिणाम लातूर जिल्ह्यावर जाणवत आहे.

Cold wave in Maharashtra : उत्तरेकडून वाहणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात कडाक्याची थंडी वाढली असून, किमान तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. काश्मीर व उत्तर भारतातील थंडीचा थेट परिणाम लातूर जिल्ह्यावर जाणवत आहे.

Cold wave in Maharashtra : काश्मीरमध्ये सुरू झालेल्या ४० दिवसांच्या कडाक्याच्या थंडीचा कालावधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'चिलाई कलान' ला २१ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून, त्याचा थेट परिणाम मराठवाडा आणि लातूर जिल्ह्यात जाणवत आहे. (Cold wave in Maharashtra)

विशेषतः मराठवाड्यात गेल्या आठवड्यापासून थंडीची लाट अधिक तीव्र झाली असून, उत्तर दिशेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे.(Cold wave in Maharashtra)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, चालू आठवडा हा यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत थंड आठवडा ठरला आहे. सलग काही दिवस किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी कमी राहिल्याने थंडीचा जोर वाढला असून, पहाटे व रात्री नागरिकांना अक्षरशः कापरे भरत आहेत.(Cold wave in Maharashtra)

तापमानात मोठी घसरण

२४ डिसेंबर रोजी लातूर जिल्ह्यातील किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, जे गेल्या काही दिवसांतील नीचांकी तापमान असल्याचे हवामान विभागाने सांगितले. 

औराद शहाजानी परिसरात तर किमान तापमान ६ अंश सेल्सिअसपेक्षा खाली नोंदवले गेले. पहाटे धुके, बोचरे वारे आणि गारठ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

काश्मीरमधील थंडीचा महाराष्ट्रावर प्रभाव

काश्मीर व उत्तर भारतात चिलाई कलान सुरू होताच हिमवृष्टी आणि तीव्र थंडीने जनजीवन गोठले आहे. याच काळात उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रात पोहोचल्याने मराठवाड्यातील तापमान झपाट्याने घसरले आहे. 

राज्यात सकाळी धुके आणि थंड वाऱ्यांमुळे नागरिक स्वेटर, मफलर, टोपीचा आधार घेताना दिसत आहेत.

सायंकाळी चार वाजल्यानंतर वातावरणात गारठा वाढत असल्याने रात्री आठ वाजेपर्यंत बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. परिणामी रस्त्यावरील वाहतूकही कमी झाली आहे. ग्रामीण भागात शेतकरी व मजूर थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत.

शेतकऱ्यांना सल्ला 

* रब्बी पिकांवर (गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला) पहाटेच्या थंडीचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हलकी पाणी फवारणी/सिंचन केल्यास गारठ्याचा परिणाम कमी होतो, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Cold Wave in Maharashtra : उत्तरेतून थंड वाऱ्यांचा मारा; राज्यात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी वाचा सविस्तर

Web Title : महाराष्ट्र में शीत लहर: राज्य में ठंड बढ़ी, तापमान गिरा, किसानों को सलाह

Web Summary : उत्तरी भारत से आई भीषण शीत लहर ने महाराष्ट्र को जकड़ लिया है, खासकर मराठवाड़ा को, जिससे तापमान में भारी गिरावट आई है। लातूर में 11 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया, कुछ क्षेत्रों में 6 डिग्री सेल्सियस से भी नीचे। किसानों को फसलों को पाले से बचाने के लिए सिंचाई करने की सलाह दी गई है, क्योंकि ठंड का असर दैनिक जीवन पर पड़ रहा है।

Web Title : Maharashtra Shivers: Cold Wave Grips State, Temperatures Plummet, Farmers Advised

Web Summary : A severe cold wave from the north has gripped Maharashtra, especially Marathwada, causing temperatures to plummet. Latur recorded 11°C, with some areas below 6°C. Farmers are advised to irrigate crops to mitigate frost damage as the cold impacts daily life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.