Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > पावसाची उघडीप, राज्यातील धरण पाणलोटात आज काय स्थिती?

पावसाची उघडीप, राज्यातील धरण पाणलोटात आज काय स्थिती?

In the absence of rain, new inflows stopped in the dam catchment | पावसाची उघडीप, राज्यातील धरण पाणलोटात आज काय स्थिती?

पावसाची उघडीप, राज्यातील धरण पाणलोटात आज काय स्थिती?

मागील दोन दिवसांपासून पावसाची उघडीप...

मागील दोन दिवसांपासून पावसाची उघडीप...

राज्यात पावसाच्या पुनरागमनानंतर आता पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिली आहे. काल बहुतांशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून आज धरणात नव्याने पाण्याची आवक झाली नाही, अशी माहिती जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर दिली आहे.

धरण साठ्यांमध्येही फारशी वाढ झालेली दिसत नसल्याचे जलसंपदा विभागाने कळवले आहे. आजपासून  पुन्हा पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 26.47 टीएमसी म्हणजेच 34.52% एवढा आहे.

आज (मंगळवार) राज्यात पुढील 24 तास तरी पावसाची उघडीप कायम राहणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज असून गुरुवारपासून विदर्भातील काही भागात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Web Title: In the absence of rain, new inflows stopped in the dam catchment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.