Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > वसमत बाजार समितीत 'पिवळे सोने' चमकले; बाजारभाव तेजीत राहण्याची आशा

वसमत बाजार समितीत 'पिवळे सोने' चमकले; बाजारभाव तेजीत राहण्याची आशा

'Yellow gold' shines in Vasmat market committee; Hope market prices will remain bullish | वसमत बाजार समितीत 'पिवळे सोने' चमकले; बाजारभाव तेजीत राहण्याची आशा

वसमत बाजार समितीत 'पिवळे सोने' चमकले; बाजारभाव तेजीत राहण्याची आशा

Halad Market : हळद खरेदी- विक्रीचे प्रमुख केंद्र असलेल्या वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी हळदीच्या दराने नवा उच्चांक गाठला. वसमत येथील मोंढ्यात एक-दोन शेतकऱ्याच्या दर्जेदार हळदीला तब्बल २८ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला.

Halad Market : हळद खरेदी- विक्रीचे प्रमुख केंद्र असलेल्या वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी हळदीच्या दराने नवा उच्चांक गाठला. वसमत येथील मोंढ्यात एक-दोन शेतकऱ्याच्या दर्जेदार हळदीला तब्बल २८ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला.

हळद खरेदी- विक्रीचे प्रमुख केंद्र असलेल्या वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी हळदीच्या दराने नवा उच्चांक गाठला. वसमत येथील मोंढ्यात एक-दोन शेतकऱ्याच्या दर्जेदार हळदीला तब्बल २८ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला.

या दरामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून, आगामी हंगामातही बाजारभाव तेजीत राहतील, अशी आशा निर्माण झाली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोंढा हळदीसाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. सोमवारी वसमत बाजार समितीत साधारणपणे ४०० ते ५०० क्विंटल हळदीची आवक झाली होती.

लिलावादरम्यान मालाची गुणवत्ता पाहून एक- दोन शेतकऱ्याच्या हळदीला २८ हजार रुपयांचा ऐतिहासिक दर मिळाला. जरी हा उच्चांकी दर काही शेतकऱ्यांच्या मालाला मिळाला असला, तरी इतर शेतकऱ्यांच्या हळदीलाही सरासरी १५ ते १६ हजार रुपये भाव मिळाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

गेल्या काही काळापासून शेतीमालाच्या दरात होणारी चढ-उतार पाहता, २८ हजारांचा हा आकडा शेतकऱ्यांसाठी दिलासा मानला जात आहे. या उच्चांकी दराची चर्चा आता जिल्ह्यात होत आहे. चांगल्या प्रतीच्या मालाला नेहमीच भाव मिळतो, हे आजच्या लिलावातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

नव्या हंगामासाठी शुभसंकेत

• सध्या बाजारात येत असलेली हळद ही मागील हंगामातील शिल्लक (जुनी) हळद आहे. मात्र, मार्च महिन्यापासून नवीन हळद मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होण्यास सुरुवात होईल.

• हंगामाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या विक्रमी दरामुळे नवीन हळदीलाही चांगला भाव मिळेल, अशी चिन्हे दिसत आहेत. बाजारात आवक मर्यादित असली तरी मागणी मोठी आहे. आज मिळालेल्या २८ हजार रुपयांच्या दरामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा

Web Title : वसमत बाजार में हल्दी की चमक; कीमतों में तेजी रहने की उम्मीद

Web Summary : वसमत बाजार में हल्दी की कीमतों ने रिकॉर्ड बनाया, उच्च गुणवत्ता के लिए ₹28,000/क्विंटल तक पहुंची। किसानों को आने वाले सीजन में कीमतों में तेजी बने रहने की उम्मीद है। बाजार में 400-500 क्विंटल की आवक हुई। कुछ किसानों को यह दर मिली, जबकि अन्य को औसतन ₹15,000-₹16,000 मिले।

Web Title : Turmeric Shines in Vasmat Market; Prices Expected to Remain High

Web Summary : Vasmat market saw record turmeric prices, reaching ₹28,000/quintal for top quality. Farmers are optimistic about continued high prices in the coming season. The market saw an arrival of 400-500 quintals. While only select farmers achieved this rate, others averaged ₹15,000-₹16,000.