Join us
Daily Top 2Weekly Top 5

खरीपातील १४ पिकांच्या किमान आधारभूत किमतींना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; वाचा किती झाली वाढ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 17:38 IST

kharif crop msp 2026-27 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२६-२७ च्या विपणन हंगामासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये (एमएसपी) वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२६-२७ च्या विपणन हंगामासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये (एमएसपी) वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी रास्त भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने २०२६-२७ विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींत वाढ केली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत एमएसपीत सर्वाधिक वाढ सूर्यफूल बियांसाठी (₹६२२ प्रति क्विंटल) सुचवण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस (₹ ५५७ प्रति क्विंटल), कारळे (नायजरसीड) (₹५१५ प्रति क्विंटल) तीळ (₹५०० प्रति क्विंटल) आहेत.

विपणन हंगाम २०२६-२७ साठी सर्व खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमती

अ.क्र.पिके२०२६-२७ (₹/क्विंटल)२०२५-२६वाढ (₹)
तांदूळ (सर्वसाधारण)२,४४१२,३६९७२
 तांदूळ (ग्रेड A)२,४६१२,३८९७२
ज्वारी (हायब्रीड)४,०२३३,६९९३२४
 ज्वारी (मालदांडी)४,०७३३,७४९३२४
बाजरी२,९००२,७७५१२५
नाचणी५,२०५४,८८६३१९
मका२,४१०२,४००१०
तूर८,४५०८,०००४५०
मूग८,७८०८,७६८१२
उडीद८,२००७,८००४००
शेंगदाणा७,५१७७,२६३२५४
१०सूर्यफूल बिया८,३४३७,७२१६२२
११सोयाबीन (पिवळा)५,७०८५,३२८३८०
१२तीळ१०,३४६९,८४६५००
१३कारळे१०,०५२९,५३७५१५
१४कापूस (मध्यम धागा)८,२६७७,७१०५५७
 कापूस (लांब धागा)८,६६७८,११०५५७

खरीप पिकांच्या MSP वाढीबाबत महत्त्वाचे मुद्दे
◼️ विपणन हंगाम २०२६-२७ साठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती (MSP) केंद्रीय अर्थसंकल्प २०१८-१९ मधील घोषणेनुसार अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट पातळीवर निश्चित करण्यात आल्या आहेत.
◼️ शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर सर्वाधिक अपेक्षित नफा मूग पिकासाठी ६१% मिळणार असून, त्यानंतर बाजरी व मका प्रत्येकी ५६% आणि तूर ५४% नफा देणारी पिके ठरणार आहेत.
◼️ उर्वरित सर्व खरीप पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या किमान ५०% अधिक लाभाची हमी देण्यात आली आहे.
◼️ सरकारने अलिकडच्या काळात तृणधान्यांबरोबरच कडधान्ये, तेलबिया आणि पौष्टिक तृणधान्ये (श्री अन्न) यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी या पिकांना अधिक MSP दिला आहे.
◼️ २०१४-१५ ते २०२५-२६ या कालावधीत धान खरेदी ८,४१८ एलएमटी झाली, तर २००४-०५ ते २०१३-१४ या कालावधीत ती ४५९० एलएमटी होती.
◼️ २०१४-१५ ते २०२५-२६ या काळात १४ खरीप पिकांची एकूण खरेदी ८,७४६ एलएमटी झाली, तर २००४-०५ ते २०१३-१४ दरम्यान ती ४६७९ एलएमटी होती.
◼️ २०१४-१५ ते २०२५-२६ या कालावधीत धान उत्पादक शेतकऱ्यांना MSP अंतर्गत १६.०८ लाख कोटी रुपये देण्यात आले, तर २००४-०५ ते २०१३-१४ या काळात ही रक्कम ४.४४ लाख कोटी रुपये होती.
◼️ २०१४-१५ ते २०२५-२६ या कालावधीत १४ खरीप पिकांच्या शेतकऱ्यांना MSP अंतर्गत १८.९९ लाख कोटी रुपये देण्यात आले, तर २००४-०५ ते २०१३-१४ या काळात ४.७५ लाख कोटी रुपये देण्यात आले.

अधिक वाचा: कर्जमाफीच्या याद्या तयार; शेतकऱ्यांना 'या' बँकांकडून मिळणार सर्वाधिक कर्जमाफीचा लाभ

English
हिंदी सारांश
Web Title : Central Cabinet Approves MSP Hike for 14 Kharif Crops

Web Summary : The central government has approved increased Minimum Support Prices (MSP) for 14 Kharif crops for the 2026-27 marketing season, benefiting farmers with fair prices. Sunflower seeds saw the highest MSP increase, followed by cotton and niger seeds. The decision aims to ensure farmers receive at least 1.5 times their production cost.
टॅग्स :खरीपपीकशेतकरीशेतीकेंद्र सरकारसरकारनरेंद्र मोदीसुर्यफुलमकाकापूसभातबाजरीज्वारीमूगसोयाबीनतूरनाचणी