हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात सध्या तुरीच्या दरातील घसरणीमुळे चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत तुरीच्या भावात क्विंटलमागे तब्बल ७०० ते १००० रुपयांची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पडझडीमुळे मोठ्या आशेने माल विक्रीसाठी आणलेल्या उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडत आहे.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तुरीचे भाव तेजीत होते. त्यावेळी बाजारपेठेत तुरीला प्रति क्विंटल नऊ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत होता. मात्र, फेब्रुवारीच्या ओसरली असून, भावात सातत्याने घसरण सुरु आहे. सध्या बाजार समितीत दररोज सरासरी ५०० ते ६०० क्विंटल तुरीची आवक होत आहे. मात्र, मागणी आणि गणित बिघडल्याने पुरवठ्याचे
शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळेनासा झाला आहे. सोयाबीन, हळद, कापसानंतर प्रमुख पीक असलेल्या तुरीला सुरुवातीला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, आता आवक वाढण्याच्या काळातच भाव कोसळल्याने आर्थिक गणिते कोलमडली आहेत. सरासरी भाव आठ हजार रुपयांचा टप्पादेखील पार करीत नसल्याचे चित्र सध्या मोंढ्यात दिसत आहे.
सोयाबीनचे भाव पाचशेंनी उतरले...
येथील मोंढ्यात गत चार दिवसांत सोयाबीनचे भाव क्विंटलमागे जवळपास पाचशे रुपयांनी उरले आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. अशा परिस्थितीत किमान समाधानकारक भाव मिळणे अपेक्षित होते. मात्र, कवडीमोल भावात सोयाबीन विक्री करावे लागले. परिणामी, शेतकऱ्यांना लागवड खर्चही वसूल झाला नाही. आता तर भावात घसरण झाल्यामुळे उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
