Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ; समाधानकारक दर मिळत नसल्याने अर्थकारण कोलमडले

शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ; समाधानकारक दर मिळत नसल्याने अर्थकारण कोलमडले

Time to throw tomatoes at farmers; Economy collapses due to not getting satisfactory prices | शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ; समाधानकारक दर मिळत नसल्याने अर्थकारण कोलमडले

शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ; समाधानकारक दर मिळत नसल्याने अर्थकारण कोलमडले

Tomato Market Rate : टोमॅटो पिकाला सध्या अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे. तरकारी पिकांना समाधानकारक दर मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.

Tomato Market Rate : टोमॅटो पिकाला सध्या अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे. तरकारी पिकांना समाधानकारक दर मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.

टोमॅटो पिकाला सध्या अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे. तरकारी पिकांना समाधानकारक दर मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.

टोमॅटो लागवडीसाठी एका एकरात नांगरणी, बेड तयार करणे, ठिबक सिंचन, रोपांची लागवड, खते व औषधांचा खर्च मिळून एकरी एक लाख रुपयांहून अधिक खर्च येतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत बाजारात प्रति दहा किलो टोमॅटोला अवघे १५० रुपये दर मिळत आहे. वाढती उष्णता, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा फटका पिकाला बसल्याने उत्पादन व गुणवत्ता यावर परिणाम झाला आहे.

दरम्यान, मजुरी दरातही मोठी वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी औद्योगिक वसाहतीत कामगारांना दिवसाला ५०० ते ७०० रुपये मजुरी मिळत असल्याने शेतमजूर शेतीकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले असून, शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढत आहे.

मागील वर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे सर्वत्र भाजीपाला पिकांचे उत्पादन वाढले होते. परिणामी बाजारात पुरवठा जास्त झाल्याने दर घसरले. कांद्यालाही अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने तो अजूनही शेतातच पडून आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान होत असून, शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

"मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने पाणी उपलब्ध होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली. मात्र सध्याचा बाजारभाव पाहता माल विक्रीस नेण्यापेक्षा फेकून देण्याची वेळ आली आहे. खर्चही निघत नसल्याने आर्थिक संकट गडद झाले आहे," अशी व्यथा तानाजी भुजबळ यांनी व्यक्त केली.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्याच्या विविध बाजारातील टोमॅटो आवक व दर   

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/04/2026
अकोला---क्विंटल4904001000700
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल86736001300950
खेड-चाकण---क्विंटल20090013001100
धुळेलालक्विंटल670590920610
धाराशिवलालक्विंटल67400800600
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल60200570500
नागपूरलालक्विंटल200080012001100
मनमाडलालक्विंटल200200635585
हिंगणालालक्विंटल8120012001200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल27993001200750
पुणेलोकलक्विंटल64784001100750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल215001000750
पुणे-मांजरीलोकलक्विंटल654001000800
पुणे-मोशीलोकलक्विंटल6973001000650
इस्लामपूरलोकलक्विंटल2297001000850
वडूजलोकलक्विंटल1001001000500
मंगळवेढालोकलक्विंटल45200950700
कामठीलोकलक्विंटल18152020201770
शेवगावनं. १क्विंटल630600900750
कल्याणनं. १क्विंटल3100013001150
शेवगावनं. २क्विंटल712300500400
शेवगावनं. ३क्विंटल698100200125
नागपूरपांढराक्विंटल13608001000950
हिंगणापांढराक्विंटल79001000950
येवलाउन्हाळीक्विंटल30002001126800
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500350953701
नाशिकउन्हाळीक्विंटल15052301100700
लासलगावउन्हाळीक्विंटल1003640015011025
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल36204111188951
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल900550016121000
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल80001301055593
संगमनेरउन्हाळीक्विंटल44722001280740
चांदवडउन्हाळीक्विंटल120301001640910
मनमाडउन्हाळीक्विंटल20003001180900
कोपरगावउन्हाळीक्विंटल19201001061750
कोपरगावउन्हाळीक्विंटल2880400936835
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3240020019211200
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल5305001158900
भुसावळउन्हाळीक्विंटल1175001000800
गंगापूरउन्हाळीक्विंटल1951100910600
रामटेकउन्हाळीक्विंटल28110015001300
देवळाउन्हाळीक्विंटल361015012551000

हेही वाचा : रेशीम शेतीतून घोराडच्या विवेकरावांनी साधली आर्थिक प्रगती; जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर लाखोंचे उत्पन्न

Web Title : टमाटर की कीमतें गिरीं; किसानों को नुकसान, आर्थिक संकट का सामना।

Web Summary : टमाटर की कीमतें गिरने से किसान फसल फेंकने को मजबूर। कम आय, उच्च लागत और मौसम की मार से ग्रामीण क्षेत्रों में गंभीर आर्थिक संकट है। मजदूरों की कमी ने संकट को और बढ़ा दिया है।

Web Title : Tomato prices crash; farmers forced to dump produce, facing economic ruin.

Web Summary : Crashing tomato prices force farmers to discard crops. Low returns, high costs, and weather damage lead to severe financial distress in rural areas. Labor shortages further exacerbate the crisis.