यंदाच्या उन्हाळी हंगामातील तिळाची काढणी अंतिम टप्प्यात असून, शेतकरी शेतमाल बाजारात विक्रीस आणत आहेत. सद्यःस्थितीत तिळाला प्रतिक्विंटल साडेनऊ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
विदर्भाच्यावाशिम जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सरासरी क्षेत्राच्या जवळपास दुप्पट क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. यामध्ये एकूण ७१२.३० हेक्टर क्षेत्रावर तिळाची लागवड करण्यात आली. सध्या शेतकऱ्यांनी काढणी पूर्ण करून माल विक्रीस सुरुवात केली आहे. कारंजा बाजार समितीत शनिवारी तिळाला कमाल ९,४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
यावेळी ८० क्विंटल तिळाची आवक झाली होती. तुलनेत मागील काही हंगामांपेक्षा यंदाचा दर समाधानकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उन्हाळी तिळाला सध्या मिळणारा दर पाहता तीळ उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असून, आगामी हंगामात या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तीळ आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
10/05/2025 | ||||||
जालना | लोकल | क्विंटल | 4 | 10500 | 10500 | 10500 |
अकोला | लोकल | क्विंटल | 4 | 8500 | 8500 | 8500 |
अमरावती | पांढरा | क्विंटल | 3 | 8500 | 9100 | 8800 |
मालेगाव | पांढरा | क्विंटल | 1 | 10400 | 10400 | 10400 |
धामणगाव -रेल्वे | पांढरा | क्विंटल | 15 | 7900 | 9000 | 8500 |
भोकर | पांढरा | क्विंटल | 2 | 9141 | 9199 | 9170 |
अहमहपूर | पांढरा | क्विंटल | 3 | 10000 | 10000 | 10000 |
परांडा | पांढरा | क्विंटल | 1 | 10500 | 10500 | 10500 |