Lokmat Agro >बाजारहाट > राज्यातील या पोस्टाने दोन दिवसांत विकले तब्बल ४ लाखांचे आंबे; वाचा सविस्तर

राज्यातील या पोस्टाने दोन दिवसांत विकले तब्बल ४ लाखांचे आंबे; वाचा सविस्तर

This post office in the state sold mangoes worth 4 lakhs in two days; Read in detail | राज्यातील या पोस्टाने दोन दिवसांत विकले तब्बल ४ लाखांचे आंबे; वाचा सविस्तर

राज्यातील या पोस्टाने दोन दिवसांत विकले तब्बल ४ लाखांचे आंबे; वाचा सविस्तर

Hapus Mango by Post भारतीय टपाल खात्याने ग्राहकांना दर्जेदार व सेंद्रीय आंबे मिळण्यासाठी घरपोच आंबे विक्रीची योजना आणली आहे.

Hapus Mango by Post भारतीय टपाल खात्याने ग्राहकांना दर्जेदार व सेंद्रीय आंबे मिळण्यासाठी घरपोच आंबे विक्रीची योजना आणली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

प्रसाद माळी
सांगली: भारतीय टपाल खात्याने ग्राहकांना दर्जेदार व सेंद्रीय आंबे मिळण्यासाठी घरपोच आंबे विक्रीची योजना आणली आहे.

याअंतर्गत सांगलीच्या प्रधान पोस्ट कार्यालयाने दोन दिवसांत तब्बल ४ लाख ७८ हजार ७५० रुपयांचे आंबे विकले. त्यामध्ये ६२५ रुपये प्रति डझनप्रमाणे ७६६ डझन आंब्यांची ग्राहकांना घरपोच विक्री केली.

कोवीडनंतरच्या काळात पोस्टाने थेट शेतकऱ्यांच्या बागेतून ग्राहकांना आंबे देण्याची घरपोच सेवा सुरू केली आहे. सांगलीच्या प्रधान पोस्ट कार्यालयाने १७ व १९ एप्रिल रोजी आंब्यांचे बुकींग घेतले व २१ व २२ एप्रिल रोजी ते ग्राहकांना वितरीत केले.

२०२२ साली एक लॉटद्वारे १५० डझन आंबे विकले व २०२४ मध्ये २ लॉटमध्ये १९८ डझन आंब्यांची विक्री केली. तर काही कारणामुळे त्यांनी २०२३ साली आंब्याची विक्री केली नाही.

सध्या बुकिंग थांबवले
या वर्षी पहिल्या लॉटमध्ये ७६६ डझन आंब्यांची विक्री केली आहे. आमच्याकडे सातत्याने आंबे बुकींग करण्यासाठी ग्राहक संपर्क करत आहेत. पण, सध्या आम्ही ते थांबवले आहे. आम्ही ज्या शेतकऱ्यांकडून माल घेतो त्यांनी सध्या आंबे कमी आहेत. जे आहेत ते तयार होण्यास वेळ लागणार आहे असे कळवले आहे. मागील बुकींगमधील १०० जणांना आंबे अजून द्यायचे आहेत. शेतकऱ्यांनी आंबे असल्याचे कळवल्यावर आम्ही दुसऱ्या लॉटसाठी पुन्हा बुकींग सुरू करू, अशी माहिती सांगली डाक विभागाचे उपअधीक्षक अर्जुन इंगळे यांनी दिली.

तीन वर्षांत आंब्यांची विक्री
वर्ष - एकूण विक्री

२०२२ - ५७,००० रुपये
२०२४ - १,७८,२०० रुपये
२०२५ - ४,७८,७५० रुपये

कोठे कराल बुकिंग
पोस्टामार्फत घरपोच उत्तम दर्जाचे हापूस आंबे मिळण्यासाठी सांगली प्रधान कार्यालय, सांगली सिटी पोस्ट, विश्रामबागेतील विलिंग्डन पोस्ट, मिरज पोस्ट व इस्लामपूर पोस्ट कार्यालय येथे ग्राहक बुकींग करू शकतात.

तीन वर्षांत १,११४ डझन आंब्यांची विक्री
पोस्टामार्फत ग्राहकांसाठी गेल्या तीन वर्षात १,११४ डझन आंब्यांची विक्री करण्यात आलेली आहे.

आंबे विक्रीमध्ये बरीच फसवणूक होते. आम्ही ग्राहकांना घरपोच सुविधा देतो. आमचा दर शेतकरी ठरवतात. शेतकऱ्यांच्या बागेतून थेट ग्राहकाच्या घरात दर्जेदार, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आंबे पोहोचवले जातात. शेतकरी आणि ग्राहकांचा फायदा व हित याच गोष्टींना आम्ही प्राधान्य देतो. - बसवराज म. वालीक, प्रवर अधीक्षक, डाक विभाग, सांगली

अधिक वाचा: पुण्यातली नोकरी सोडली आणि केशर आंब्याची शेती केली; वर्षाला ५ लाख रुपयांची कमाई झाली

Web Title: This post office in the state sold mangoes worth 4 lakhs in two days; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.