पुणे : गोड, आंबट चवीच्या बोरांना पर्यटनस्थळांसह शहर, उपनगरासह परराज्यांतून मागणी वाढली आहे. त्यामुळे बोरांच्या भावात १० टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती मार्केटयार्डातील व्यापारी रवींद्र शहा यांनी दिली.
यंदा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बोरांचा हंगाम सुरू झाला असून, तो फेब्रुवारीअखेरपर्यंत सुरू राहणार आहे.
सध्या मार्केटयार्ड फळबाजारात ३०० पोत्यांची आवक होत असून हवेत गारवा वाढल्यामुळे थंड आणि रसदार फळे खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे बोरं खाण्यास नागरिक पसंती देत आहेत. त्यामुळे बोरांना मागणी वाढली आहे.
शहरातील व उपनगरातील किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. याबरोबरच महाबळेश्वर, लोणावळा, सिंहगड, खंडाळासह विविध पर्यटनस्थळांवरून बोरांना मागणी आहे.
बोरांचा घाऊक बाजारातील दर्जानुसार १० किलोंचा भाव
बोरांचा प्रकार : भाव (रुपयांमध्ये)
चमेली : ३००-३८०
चेकनट : ९५०-११००
उमराण : ८०-१२०
चण्यामण्या : ६५०-७५०
हवेत गारवा वाढल्यामुळे थंड आणि रसदार फळे खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने सध्या बोरांना मागणी वाढली आहे. तसेच शहर, उपनगरासह परराज्यांतून मागणी वाढत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बोरांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. - रवींद्र शहा, व्यापारी
अधिक वाचा: गाव नकाशावरील रस्त्यांची आता अभिलेखात होणार रंगनिहाय नोंद; कोणत्या रस्त्याला कोणता रंग?
