Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > तुरीचा बाजारभाव वाढला; मिळतोय उच्चांकी दर

तुरीचा बाजारभाव वाढला; मिळतोय उच्चांकी दर

The market price of pigeon pea tur increased; Highest rate available | तुरीचा बाजारभाव वाढला; मिळतोय उच्चांकी दर

तुरीचा बाजारभाव वाढला; मिळतोय उच्चांकी दर

पावसामुळे माल खराब झालेला आहे. त्यामुळे उतारा कमी मिळत आहे. येत्या काळात तुरीच्या दारात आणखी वाढ  होण्याची शक्यता आहे. महिनाभरात १२ हजार रुपयांपर्यंत दर जाण्याचा अंदाज आहे. एप्रिलनंतर त्याहीपेक्षा जास्त भाव मिळेल.

पावसामुळे माल खराब झालेला आहे. त्यामुळे उतारा कमी मिळत आहे. येत्या काळात तुरीच्या दारात आणखी वाढ  होण्याची शक्यता आहे. महिनाभरात १२ हजार रुपयांपर्यंत दर जाण्याचा अंदाज आहे. एप्रिलनंतर त्याहीपेक्षा जास्त भाव मिळेल.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील पंधरा दिवसांपासून तुरीच्या दरात वाढ होत आहे. सोमवारी उच्चांकी हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला आहे. मागील दहा दिवसांपूर्वी १० हजार दोनशे रुपयांचा दर मिळाला होता. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याप्रमाणे तुरीचीही आवक वाढत आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी तुरीचा दर आठ हजारांपर्यंत खाली गेला होता. मात्र, यंदा परतीच्या पावसामुळे तुरीला अळ्या लागल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे यंदा तुरीची दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली होती. त्यानुसार मागील महिनाभरापासून तुरीची आवक वाढलेली आहे.

सोमवारी जवळपास ४० गाड्यांची आवक होती. तूरडाळीची मागणी वाढल्यामुळे तुरीच्या दारात वाढ होत आहे. पावसामुळे माल खराब झालेला आहे. त्यामुळे एकरी उतारा कमी निघत आहे; मात्र सध्या मालाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सोमवारी झालेल्या लिलावात जवळपास ४०० क्विंटल मालाची आवक होती. त्यात ८६०० ते १०५०० रुपयांपर्यंत दर मिळालेला आहे. सरासरी दर दहा हजारांच्या आसपास असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरूळ येथील शेतकरी रामचंद्र पोतदार यांच्या पाच पिशव्यांना सर्वाधिक १०,५०० रुपयांचा दर मिळाला आहे. हुडे यांच्याकडून एस.एस. अँग्रोचे श्रीशैल अंबारे यांनी सर्वाधिक दराने माल खरेदी केली आहे.

एका दिवसात चाळीस लाखांची उलाढाल
तुरीच्या दारात वाढ झाल्याने सोमवारी एका दिवसात चाळीस लाखांची उलाढाल झाली आहे. मागील आठवड्यातही एका शेतकऱ्याच्या तीन पिशव्यांना दहा हजार दोनशे रुपयांचा दर मिळालेला होता. त्यात आता पुन्हा वाढ झाली आहे.

पावसामुळे माल खराब झालेला आहे. त्यामुळे उतारा कमी मिळत आहे. येत्या काळात तुरीच्या दारात आणखी वाढ  होण्याची शक्यता आहे. महिनाभरात १२ हजार रुपयांपर्यंत दर जाण्याचा अंदाज आहे. एप्रिलनंतर त्याहीपेक्षा जास्त भाव मिळेल, असेही सांगण्यात येत आहे. - बसवराज इटकळे, व्यापारी संचालक, बाजार समिती

Web Title: The market price of pigeon pea tur increased; Highest rate available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.