सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याला कमाल दर २७५० असा उच्चांकी भाव मिळाला.
मंगळवारी बाजार समितीत १७६ कांद्याचे ट्रक लिलावासाठी आले होते. किमान दर १००, कमाल २७५०, तर सर्वसाधारण दर १२५० असा भाव मिळाला.
मंगळवारी २ कोटी २१ लाख २ हजार ५०० रुपयांची उलाढाल कांदा मार्केटमध्ये झाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले. मंगळवारी ३५ हजार ३६४ क्विंटल पिशव्यात १७ हजार ६८२ क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता.
मागील काही दिवसांपासून बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. पुणे, इंदापूर, अहिल्यानगर, विजयपूर, धाराशिव, उमरगा व सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातून कांदा विक्रीसाठी येत आहे.
कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या चढ उतारामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र सध्या तरी चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी आहे.
अधिक वाचा: शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांवर 'या' शेतकऱ्यांना विकता येणार आता मर्यादेपेक्षा अधिक सोयाबीन
