Lokmat Agro >बाजारहाट > उन्हाळ्यामुळे मोगरा फुलांच्या उत्पादनात घट; दर हजारावर जाण्याची शक्यता

उन्हाळ्यामुळे मोगरा फुलांच्या उत्पादनात घट; दर हजारावर जाण्याची शक्यता

Summer brings decline in Mogra flower production; chances of it going up to a thousand | उन्हाळ्यामुळे मोगरा फुलांच्या उत्पादनात घट; दर हजारावर जाण्याची शक्यता

उन्हाळ्यामुळे मोगरा फुलांच्या उत्पादनात घट; दर हजारावर जाण्याची शक्यता

Mogra Bajar Bhav उन्हाळ्यामुळे उत्पादनात घट व लग्नसराईसाठी मागणी जास्त असल्याने मोगऱ्याच्या फुलांचा दर दुपटीने वाढून किलोला आठशेपर्यंत पोहोचला आहे.

Mogra Bajar Bhav उन्हाळ्यामुळे उत्पादनात घट व लग्नसराईसाठी मागणी जास्त असल्याने मोगऱ्याच्या फुलांचा दर दुपटीने वाढून किलोला आठशेपर्यंत पोहोचला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

उन्हाळ्यामुळे उत्पादनात घट व लग्नसराईसाठी मागणी जास्त असल्याने मोगऱ्याच्या फुलांचा दर दुपटीने वाढून किलोला आठशेपर्यंत पोहोचला आहे.

यामुळे नववधूची वेणी मोगऱ्याऐवजी काकडा फुलांनीच सजविण्यात येत आहे. लग्नसराईमुळे मिरजेच्या सध्या मोगऱ्यांच्या फुलांना मोठी मागणी आहे.

प्रतिवर्षी लग्नसराईत महिलांच्या गजऱ्यासाठी मोगरा फुलांना मोठी मागणी असते. सध्या मोगऱ्याचा प्रतिकिलो दर ८०० ते ९०० रुपये आहे. मोगरा व काकडा या फुलांची आवक बाहेरून होते.

कर्नाटकातील हुबळी, बेंगलोर, टूमकूर परिसरातून येणाऱ्या काकडा व अबोली या पर्यायी फुलांच्याही गजऱ्याला मागणी असल्याने दर किलोला ६०० रुपयांपर्यंत आहेत. पंढरपूर, मंगळवेढा परिसरातून मोगऱ्याची फुले मिरजेच्या बाजाराच्या येतात.

कळी तोडणीचा खर्च जास्त
- मोगऱ्याची फुले अतिशय नाजूक असतात. यामुळे तयार फुलांऐवजी कळी तोडून आणण्यात येते.
- या कळ्या सुईने ओवण्याऐवजी दोऱ्याच्या गाठी बांधून गजरा तयार करण्यात येतो.
- या गजऱ्यांची किलोवर किंवा बंडलवर विक्री होते.
- कळी तोडणी व बांधणीचा मजुरी खर्च असल्याने मोगरा व काकडा फुलांच्या गजऱ्याचा दर जास्त आहे.
- या गजऱ्यांची विक्री झाली नाही तर एका दिवसात तो कोमेजतो.

प्लास्टिक फुलांचाही वापर
फुलांच्या गजऱ्याऐवजी हुबेहूब दिसणाऱ्या प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांच्या गजऱ्याचाही वापर सुरू आहे. यामुळेही व्यवसायावर परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मोगरा दर हजारावर जाण्याची शक्यता
बाजारात कमी झालेली आवक व वाढलेल्या मागणीमुळे दरात वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामात मोगरा हजारावर जाण्याची शक्यता असल्याचे व्यापारी आनंदा माळी यांनी सांगितले.

अन्य फुलांचे दरही तेजीत
मिरज दुय्यम बाजार आवारात दररोज फुलांचे सौदे होतात. पश्चिम महाराष्ट्रात हा मोठा बाजार असल्याने कोल्हापूर, पुणे, सातारा, बेळगाव, विजापूरकडे फुले निर्यात होतात. लग्नसराईमुळे अन्य फुलांचे दरही तेजीत आहेत.

अधिक वाचा: Jaltara : मनरेगातुन जलतारा खड्डा कसा आणि कुठे काढावा? किती मिळतंय अनुदान? वाचा सविस्तर

Web Title: Summer brings decline in Mogra flower production; chances of it going up to a thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.