पुणे : नाताळ सणामुळे स्ट्रॉबेरीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो स्ट्रॉबेरीचे दर ३०० ते ७०० रुपयांपर्यंत आहेत. नाताळात स्ट्रॉबेरीला देशभरातून मागणी वाढते.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळ बाजारात महाबळेश्वर, वाई भागातील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत स्ट्रॉबेरीच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील स्ट्रॉबेरी व्यापारी युवराज काची यांनी दिली.
महाबळेश्वर, वाई भागातील शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. नाशिक परिसरातील शेतकरी लागवड करतात.
ऑक्टोबर महिन्यात स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होता. साधारणपणे मार्चअखेरपर्यंत स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होता. एप्रिल महिन्यात हंगामाची अखेर होती. सध्या डिसेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीची आवक वाढते.
यंदा लांबलेला पाऊस आणि हवामान बदलाचा मोठा फटका स्ट्रॉबेरीला बसला आहे. बाजारात मागणीच्या तुलनेत स्ट्रॉबेरीची आवक कमी होत आहे. स्ट्रॉबेरीची दर आणखी काही दिवस तेजीत राहणार आहेत. थंडी कमी झाल्यानंतर स्ट्रॉबेरीची आवक वाढेल. - युवराज काची, व्यापारी
अधिक वाचा: राज्यातील 'ह्या' महामार्गासाठी भूसंपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींना मिळणार तब्बल चौपट मोबदला
