Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीनची आवक ८४.५ टक्क्यांनी वाढली; काही ठिकाणी हमीदरापेक्षा जास्त तर काही ठिकाणी भाव कोसळले

सोयाबीनची आवक ८४.५ टक्क्यांनी वाढली; काही ठिकाणी हमीदरापेक्षा जास्त तर काही ठिकाणी भाव कोसळले

Soybean arrivals increased by 84.5 percent; prices above the guaranteed price in some places, prices fell in others | सोयाबीनची आवक ८४.५ टक्क्यांनी वाढली; काही ठिकाणी हमीदरापेक्षा जास्त तर काही ठिकाणी भाव कोसळले

सोयाबीनची आवक ८४.५ टक्क्यांनी वाढली; काही ठिकाणी हमीदरापेक्षा जास्त तर काही ठिकाणी भाव कोसळले

Soybean Market Rate : राज्यात मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या आवकेत लक्षणीय वाढ नोंदविली गेली आहे. राज्यस्तरावर सोयाबीनची आवक तब्बल ८४.५ टक्क्यांनी वाढली असून, विविध बाजार समित्यांमध्ये पुन्हा एकदा सोयाबीनची रेलचेल वाढताना दिसत आहे.

Soybean Market Rate : राज्यात मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या आवकेत लक्षणीय वाढ नोंदविली गेली आहे. राज्यस्तरावर सोयाबीनची आवक तब्बल ८४.५ टक्क्यांनी वाढली असून, विविध बाजार समित्यांमध्ये पुन्हा एकदा सोयाबीनची रेलचेल वाढताना दिसत आहे.

सागर कुटे

राज्यात मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या आवकेत लक्षणीय वाढ नोंदविली गेली आहे. राज्यस्तरावर सोयाबीनची आवक तब्बल ८४.५ टक्क्यांनी वाढली असून, विविध बाजार समित्यांमध्ये पुन्हा एकदा सोयाबीनची रेलचेल वाढताना दिसत आहे.

आवक वाढलेली असली तरी सोयाबीनचे दर बहुतांश ठिकाणी कोसळल्याचे चित्र आहे. भाव चांगले मिळत असल्यामुळे अनेक शेतकरीबाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्री करीत आहेत.

लातूर बाजारात सर्वाधिक दर

• साप्ताहिक बाजार भावाच्या आकडेवारीनुसार, मागील आठवड्यात लातूर बाजारपेठेत सोयाबीनला सर्वाधिक सरासरी ५,७०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.

• विशेष म्हणजे, मागील आठवड्याच्या तुलनेत लातूरमधील किमतीत ३.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

• केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ साठी ५,३२८ रुपये प्रतिक्विंटल अशी किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे.

• सध्या लातूरसह अनेक प्रमुख बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे दर या आधारभूत किमतीच्या वर आहेत.

• विदर्भातील बाजार समित्यांमध्ये दर कमी झाल्याचे दिसून आले. काही बाजार समित्यांमध्ये सोमवारी दर ३०० रुपयांपर्यंत कोसळले.

आवक आणि किमतीचा कल

• माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या अखेरीस सोयाबीनची आवक काही प्रमाणात घटली होती. मात्र, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यात पुन्हा मोठी वाढ झाली आहे.

• भारताच्या तुलनेत राज्यात आवक ही स्थिर गतीने वाढत असून, ८ फेब्रुवारी २०२६ अखेर संपलेल्या आठवड्यात ती उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे.

• मलकापूर बाजारपेठेत मात्र इतर ठिकाणांच्या तुलनेत काहीशी कमी (५,२९६ रुपये) सरासरी किंमत नोंदविण्यात आली आहे.

प्रमुख बाजारपेठांमधील सरासरी दर (प्रति क्विंटल)

लातूर - ५,७००
सोलापूर - ५,५९९
अकोला - ५,५४८
अमरावती - ५,३५७
मलकापूर - ५,२९६

हेही वाचा : परिस्थितीशी झुंज देत विजयालक्ष्मी यांची दुग्धव्यवसायात भरारी; आता महिन्याकाठी १ लाख रुपयांची कमाई

Web Title : सोयाबीन की आवक बढ़ी, कीमतों में उतार-चढ़ाव: बाजार का अवलोकन

Web Summary : महाराष्ट्र में सोयाबीन की आवक 84.5% बढ़ी, लेकिन कीमतों में भिन्नता रही। लातूर में सबसे अधिक दर (₹5,700/क्विंटल) देखी गई, जो MSP से अधिक है। विदर्भ के बाजारों में कीमतों में गिरावट आई। बढ़ी हुई आपूर्ति विभिन्न क्षेत्रों में मूल्य अस्थिरता के विपरीत है।

Web Title : Soybean Arrival Surges, Prices Fluctuate: Market Overview

Web Summary : Soybean arrivals in Maharashtra surged 84.5%, but prices varied. Latur saw the highest rate (₹5,700/quintal), exceeding the MSP. Vidarbha markets faced price drops. Increased supply contrasts with price volatility across regions.