लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी सोयाबीनची १८ हजार क्विंटल एवढी आवक झाली. सोयाबीनचे दर स्थिर आहेत, तर तूर आणि करडईला चांगला दर मिळाला.
सोमवारी सोयाबीनची आवक १८ हजार १९६ क्विंटल इतकी झाली. सोयाबीनचा किमान दर ४ हजार ३२४, कमाल दर ४ हजार ६२० रुपये तर सर्वसाधारण दर साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा होता.
तुरीचा कमाल दर ६ हजार ७९१ रुपये प्रति क्विंटल मिळाला, तर सर्वसाधारण दर ६ हजार ६०० रुपये नोंदवला गेला. तुरीची आवक ५९० क्विंटल झाली. हरभऱ्याला देखील ५ हजार ३०० चा कमाल दर मिळाला, तर सर्वसाधारण दर ४ हजार ८०० रुपये राहिला. त्याची आवक ६५८ क्विंटल नोंदवली गेली.
आवक कमी, दर जास्त
करडईची केवळ ३५ क्विंटल एवढी आवक झाल्याने करडईला कमाल दर ९ हजार ३७० रुपये तर किमान दर ६ हजार ३०० रुपये एवढा होता. गव्हाची आवक १५३ क्विंटल झाली, तर सर्वसाधारण दर ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल होता.
पिवळ्या ज्वारीचा सर्वसाधारण दर ४ हजार ४०० रुपये तर रब्बी ज्वारीचा दर ३ हजार ३०० रुपये एवढा होता. गुळाचा सर्वसाधारण दर ३ हजार ६०० रुपये एवढा होता.
कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील करडई आवक व दर
| बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
|---|---|---|---|---|---|---|
| 08/12/2025 | ||||||
| औराद शहाजानी | नं. १ | क्विंटल | 8 | 6450 | 7100 | 6775 |
| लातूर | सफेद | क्विंटल | 35 | 6300 | 9370 | 9000 |
| 06/12/2025 | ||||||
| मुरुम | सफेद | क्विंटल | 1 | 6000 | 6000 | 6000 |
हेही वाचा : उत्तम आरोग्यासाठी साखर खाणं हानिकारकच, पण गूळ किती चांगला? जाणून घ्या सविस्तर
