Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > संकेश्वरी मिरचीला उच्चांकी दर अन् शेतकऱ्याने चक्क वाटले पेढे; वाचा प्रतिकिलो काय मिळाला दर?

संकेश्वरी मिरचीला उच्चांकी दर अन् शेतकऱ्याने चक्क वाटले पेढे; वाचा प्रतिकिलो काय मिळाला दर?

Sankeshwari chillies fetch high prices and farmers are happy to share their crops; Read what price was received per kg? | संकेश्वरी मिरचीला उच्चांकी दर अन् शेतकऱ्याने चक्क वाटले पेढे; वाचा प्रतिकिलो काय मिळाला दर?

संकेश्वरी मिरचीला उच्चांकी दर अन् शेतकऱ्याने चक्क वाटले पेढे; वाचा प्रतिकिलो काय मिळाला दर?

mirchi market आजपर्यंतच्या इतिहासातील संकेश्वरी मिरचीला उच्चांकी दर असल्याचे खरेदीदार अडत व्यापारी व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

mirchi market आजपर्यंतच्या इतिहासातील संकेश्वरी मिरचीला उच्चांकी दर असल्याचे खरेदीदार अडत व्यापारी व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

गडहिंग्लज : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवड्याच्या सौद्यात संकेश्वरी मिरचीला प्रतिकिलो १९०० रुपये दर मिळाला.

आजपर्यंतच्या इतिहासातील हा उच्चांकी दर असल्याचे खरेदीदार अडत व्यापारी व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

तनवडी येथील शेतकरी शिवाप्पा गंगाप्पा आरबोळे यांनी येथील रोहित विजयकुमार मांडेकर यांच्या अडत दुकानात आपली संकेश्वरी मिरची सौद्याला आणली होती.

मिरची व्यापारी राजन जाधन यांनी प्रतिक्विंटल १,९०,००० रुपये (प्रतिकिलो १९००) दराने ती खरेदी केली. त्यामुळे आरबोळे यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

दरवर्षी संकेश्वरी (ज्वारी) मिरचीला प्रतिकिलो १२०० ते १५०० रुपये इतका दर मिळतो. परंतु, यावर्षी अतिपावसामुळे सुरुवातीस उत्पादन कमी झाले.

त्यात डागी मिरचीचे प्रमाण जास्त असल्यामुळे दर कोसळले. त्यामुळे प्रतिकिलो ८०० ते १००० रुपये दर मिळाला.

मात्र, यंदाच्या हंगामाचा शेवट गोड झाला. यापूर्वी 'संकेश्वरी'ला प्रतिकिलो १७४० रु. उच्चांकी दर मिळाला होता. आरबोळे यांच्या मिरचीला मिळालेल्या दराने नवा उच्चांक प्रस्थापित झाला.

'संकेश्वरी'चेही ब्रॅडींग व्हावे
◼️ गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील १५ गावांसह सीमाभागातही 'संकेश्वरी'चे उत्पादन घेतले जाते.
◼️ परंतु, त्याचे मूळ संकेश्वर हेच असल्याने 'संकेश्वरी' नावानेच ती देश-विदेशात ओळखली जाते.
◼️ देशी वाणाची ही मिरची चवीला तिखट आहे. त्याची पावडर लवकर खराब होत नाही.
◼️ मुंबई, पुणेसह कोकण-गोव्यालाही ही मिरची जाते
◼️ नांदेड जिल्ह्यातील रोही-पिंपळगाव येथील शेतकऱ्यांनीही गतवर्षीपासून या मिरचीचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे.
◼️ तसेच मराठवाड्यातही संकेश्वरी मिरचीचे वाण पोहोचले आहे.
◼️ त्यामुळे 'आजरा घनसाळ' तांदळाप्रमाणे 'संकेश्वरी मिरची'च्या ब्रॅडींग व मार्केटिंगसाठी शासन पातळीवरच प्रयत्न होणे आवश्यक आहे.

अधिक वाचा: साडेचार फूट सरी ठेवून ८६०३२ उसाची लागवड; उत्पादनात एकरी १६० टनाची मजल मारणार

Web Title: Sankeshwari chillies fetch high prices and farmers are happy to share their crops; Read what price was received per kg?