Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > मागील वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात ३० टक्के वाढ; वाचा कोणत्या मिरचीला किती दर?

मागील वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात ३० टक्के वाढ; वाचा कोणत्या मिरचीला किती दर?

Red chilli prices increase by 30 percent compared to last year; Read: What is the price of each chilli? | मागील वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात ३० टक्के वाढ; वाचा कोणत्या मिरचीला किती दर?

मागील वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात ३० टक्के वाढ; वाचा कोणत्या मिरचीला किती दर?

lal micrhi market गेल्यावर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात सरासरी ३० टक्के वाढ झाली आहे. हंगामात सततचा राहिलेला पाऊस त्यातून मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने आवक मंदावली आहे.

lal micrhi market गेल्यावर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात सरासरी ३० टक्के वाढ झाली आहे. हंगामात सततचा राहिलेला पाऊस त्यातून मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने आवक मंदावली आहे.

कोल्हापूर : गेल्यावर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात सरासरी ३० टक्के वाढ झाली आहे. हंगामात सततचा राहिलेला पाऊस त्यातून मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने आवक मंदावली आहे.

त्यामुळे यंदा लाल मिरची ग्राहकांच्या जिभेला चटका देणार, हे निश्चित आहे. गेल्यावर्षी मिरचीचे पीक मुबलक झाल्याने आवक वाढली होती.

अखंड हंगामात 'ब्याडगी' मिरचीचा भाव ३५० रुपयांच्या (एक नंबर माल) पुढे गेला नव्हता. मात्र आता सरासरी दरात ३० टक्के वाढ झाली आहे.

मात्र, यंदा खरीप हंगामात मिरचीचे पीक फुलोरा अवस्थेत असताना पावसाने झोडपून काढल्याने फळगळ मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे राज्यभरात 'ब्याडगी' सह सर्व प्रकारची मिरचीची आवक कमी झाली आहे.

आंध्र प्रदेश, कर्नाटकातून आवक
◼️ कोल्हापूर जिल्ह्यात साधारणतः जानेवारी ते मे असा लाल मिरचीचा हंगाम असतो.
◼️ या काळात मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी होते.
◼️ आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा व गुजरात येथून मिरचीची आवक होते.
◼️ त्यातही गुजरातमधून खूप कमी प्रमाणात असते.

मिरचीचे दर (प्रति किलोमध्ये)
'केडीएल' ब्याडगी : ३०० ते ६००
संकेश्वरी जवारी (ओरिजनल) : ११०० ते १२००
तेजा : २५० ते ३५०
गुंटूर : ३०० ते ३५०
सिजेंटा : ४०० ते ५००
गरुडा : २५० ते ४००

सततच्या पावसामुळे यंदा मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. दर वाढल्याने ग्राहकांनी आतापासूनच मिरची खरेदीसाठी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. - राजेंद्र जंगम, मिरची व्यापारी, सांगरूळ

यंदा आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली असून आता जुना मालही बाजारात विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना काळजी घ्यावी. - सुनील अस्वले, मिरची व्यापारी, कोल्हापूर

अधिक वाचा: देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर ३३ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज; केद्र सरकार कर्जमाफी करणार का?

Web Title : पिछले साल की तुलना में लाल मिर्च की कीमतों में 30% उछाल

Web Summary : लगातार बारिश से कम उपज के कारण लाल मिर्च की कीमतों में 30% की वृद्धि हुई है। 'ब्याडगी' मिर्च की कीमतें बढ़ गई हैं, जिससे उपभोक्ताओं पर असर पड़ रहा है। आंध्र प्रदेश और कर्नाटक से आपूर्ति महत्वपूर्ण है। किसान और व्यापारी खरीदते समय सावधानी बरतने की सलाह देते हैं।

Web Title : Red Chili Prices Surge 30% Compared to Last Year

Web Summary : Red chili prices have increased by 30% due to reduced yields from continuous rain. 'Byadgi' chili prices are up, impacting consumers. Supply from Andhra Pradesh and Karnataka is crucial. Farmers and traders advise caution when purchasing.