Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > खते, बियाण्यांच्या किंमती झाल्या चौपट; धानाच्या हमीभावात मात्र ७२ रुपयांची बोळवण

खते, बियाण्यांच्या किंमती झाल्या चौपट; धानाच्या हमीभावात मात्र ७२ रुपयांची बोळवण

Prices of fertilizers and seeds have quadrupled; however, the MSP of paddy has increased by Rs 72. | खते, बियाण्यांच्या किंमती झाल्या चौपट; धानाच्या हमीभावात मात्र ७२ रुपयांची बोळवण

खते, बियाण्यांच्या किंमती झाल्या चौपट; धानाच्या हमीभावात मात्र ७२ रुपयांची बोळवण

खते, बियाणे यांचे दर चौपट झाले असून, लागवड खर्चात वाढ झाली. पण त्यातुलनेत धानाला मिळणारा हमीभाव हा फारच कमी आहे. २३ वर्षांत धानाच्या हमीभावात केवळ १८९१ रुपयांची वाढ झाली आहे.

खते, बियाणे यांचे दर चौपट झाले असून, लागवड खर्चात वाढ झाली. पण त्यातुलनेत धानाला मिळणारा हमीभाव हा फारच कमी आहे. २३ वर्षांत धानाच्या हमीभावात केवळ १८९१ रुपयांची वाढ झाली आहे.

अंकुश गुंडावार 

केंद्र सरकारने बुधवारी (दि.१३) १४ प्रमुख पिकांचे हमीभाव जाहीर केले. त्यात धानाच्या हमीभावात ७२ रुपयांनी वाढ केली. धानाला आता प्रति क्विंटल २४४१ रुपये हमीभाव मिळणार आहे.

खते, बियाणे यांचे दर चौपट झाले असून, लागवड खर्चात वाढ झाली. पण त्यातुलनेत धानाला मिळणारा हमीभाव हा फारच कमी आहे. २३ वर्षांत धानाच्या हमीभावात केवळ १८९१ रुपयांची वाढ झाली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत धानाला मिळणारा हमीभाव कमी असल्याने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा आहे. धान हेच प्रमुख पीक असून, यावरच गोंदिया जिल्ह्यातील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. खरिपात १ लाख ९६ हजार तर रब्बी ७२ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. पण, दिवसेंदिवस धानाची शेती तोट्याची होत चालली आहे. त्यामुळे शेतकरी धान पिकाला पर्याय शोधू लागले आहेत.

धानाच्या लागवड खर्चात दरवर्षी वाढच होत असून, त्या तुलनेत धानाला मिळणारा दर हा कमी असल्याने धानाची शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सौदा होत चालला आहे.

त्यामुळेच धान उत्पादक शेतकरी आता इतर पीक घेण्याकडे वळत आहे धानाचा एकरी लागवड खर्च सध्या २५ ते ३० हजारावर पोहोचला आहे. पण, नैसर्गिक संकटांचा धान दरवर्षी फटका बसत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.

गेल्या २३ वर्षात धानाच्या हमीभावात केवळ १८९१ रुपयांची वाढ झाली असून, उत्पादन खर्च मात्र तिप्पट वाढला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२४-२५ खरीप हंगामातील धानाच्या हमीभावात १८३ रुपयांनी वाढ केली होती.

त्यामुळे धानाला प्रति क्विंटल २३०० रुपये हमीभाव मिळाला. सन २०२५-२६ करिता कृषी ६९ रुपयांची वाढ केली होती. तर सन २०२६-२७ करिता ७२ रुपये हमीभावात वाढ केली. त्यामुळे शेतकऱ्यांना २४४१ रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळणार आहे.

२३ वर्षातील धानाचे हमीभाव

वर्ष धानाचा हमीभाववर्ष धानाचा हमीभाववर्षधानाचा हमीभाव
२००३-०४ ५५० २००४-०५ ५६० २००५-०६ ५७० 
२००६-०७ ५८० २००७-०८ ६४५ २००८-०९ ६८५ 
२००९-१० ९५० २०१०-११ १००० २०११-१२१०८० 
२०१२-१३ १२५० २०१३-१४ १३१० २०१४-१५ १३६० 
२०१५-१६ १४१० २०१६-१७ १४७० २०१७-१८ १५५० 
२०१८-१९ १७५० २०१९-२० १८१५ २०२०-२१ १८६८ 
२०२१-२२ १९४० २०२२-२३ २१४० २०२३-२४ २१८३ 
२०२४-२५ २३०० २०२५-२६ २३६९ २०२६-२७ २४४१ 

खताचे नवीन आणि जुने दर

खताचा प्रकारजूने दर नवीन दरझालेली दरवाढ
२०.२०.०.१३ १५०० १८०० ३०० रुपये 
१०.२६.२६ २०२५ २२५० २२५ रुपये
१२.३२.६१ २०२५ २२५० २२५ रुपये
१४.३५.१४ २१७५ २२४० २२५ रुपये
१९.१९.१० २०७५२३०० २२५ रुपये
एमओपी१८५० १९७५ १२५ रुपये

धानाच्या लागवड खर्चात पाचपट वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातसुद्धा वाढ झाल्याने त्याचासुद्धा परिणाम लागवड खर्चावर होत आहे. त्यामुळे धानाच्या हमीभावात भरीव वाढ होणे अपेक्षित होते.  - सुखदेव मेंढे, धान उत्पादक शेतकरी, सिलेझरी.

सन २०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी शेतमालाला खर्चावर आधारावर दुप्पट भाव देण्याची घोषणा केली होती. पण, दरवर्षीप्रमाणे यंदाही पिकाच्या आधारभूत किंमत जाहीर करताना थानाच्या हमीभावात केवळ ७२ रुपये वाढवून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. याच सरकारने आठ दिवसांपूर्वी खताच्या किमतीत भरमसाठ वाढ केली याचेही भान सरकारला नाही. - गंगाधर परशुरामकर, प्रगतिशील शेतकरी.

खते, बियाण्यांच्या किमती झाल्या चौपट

धानशेतीच्या लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खते, बियाणे, मजुरी व इतर खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. २० वर्षांपूर्वी धानाच्या शेतीचा एकरी लागवड खर्च १२ ते १३ हजार रुपये होता. तो आता २५ ते ३० हजारावर पोहोचला आहे. पण, त्या तुलनेत हमीभाव मिळत नसल्याने धान शेती तोट्याचा सौदा होत आहे.

धानाच्या शेतीचा एकरी लागवड खर्च २२ ते २५ हजार रुपये आहे. तर एकरी १५ ते १८ क्विंटल धानाचे उत्पादन होते. सर्व खर्च जाता शेतकऱ्यांच्या हातात केवळ तीन ते चार हजार रुपये शिल्लक राहतात. त्यातून वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? - राधेश्याम झोले, युवा शेतकरी, बोंडगावदेवी.

हेही वाचा : तुम्हालाही नैसर्गिक गरजेपेक्षा अधिक घाम येतो का? काळजी घ्या; गंभीर आजरांचा धोका अधिक 

Web Title : खाद, बीज के दाम चौगुने; धान के एमएसपी में मामूली वृद्धि।

Web Summary : गोंदिया जिले के किसान परेशान हैं क्योंकि खाद और बीज की लागत चौगुनी हो गई है, जबकि धान के न्यूनतम समर्थन मूल्य (एमएसपी) में केवल ₹72 की वृद्धि हुई है। बढ़ी हुई लागत धान की खेती को अलाभकारी बना रही है, जिससे किसान वैकल्पिक फसलें तलाशने को मजबूर हैं।

Web Title : Fertilizer, seed prices quadruple; paddy MSP sees meager hike.

Web Summary : Farmers in Gondia district are upset as fertilizer and seed costs have quadrupled, while the increase in paddy Minimum Support Price (MSP) is only ₹72. Increased input costs make paddy farming unprofitable, pushing farmers to seek alternative crops.