उन्हाळ्यात सर्वांनाच घाम येतो; परंतु काही लोकांना शरीराच्या नैसर्गिक गरजेपेक्षा जास्त घाम येतो. अशा व्यक्तींना अगदी थंड वातावरणात किंवा हालचाल न करताही सारखा घाम येतो.
या आजाराला हायपर हायड्रोसिस असे म्हणतात. या व्यक्तींच्या तळहाताला आणि तळपायाला, कपाळावर अति घाम येतो. हातांच्या काखेतही घाम येतो. यामुळे हार्मोनल इन बॅलन्स होण्याचाही धोका निर्माण होतो. अशा व्यक्तींना ही समस्या आनुवंशिक असू शकते.
थायरॉइड, मधुमेह या आजारांमुळे हा प्रकार घडू शकतो. दररोज आंघोळ करताना अँटिबायोटिक साबणाचा वापर करावा. या गोष्टींचा वापर केला तर हायपर हायड्रोसिस आजाराला प्रतिबंध करता येतो.
घाम येणे चांगले आहे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. मात्र, अतिप्रमाणात घाम येणे हे चांगले लक्षण नाही. यामुळे ब्रेन स्ट्रोक येण्याचा मोठा धोका असतो.
थंड वातावरणातही का येतो घाम?
• हायपर हायड्रोसिस असणाऱ्या व्यक्तींना कुलर, एसी अथवा परिसरात थंडीचे वातावरण असले तरी घाम येतो. याला अनेक बाबी कारणीभूत असतात. मधुमेह, रक्तदाब, थायरॉइडचे प्रमाण वाढल्यामुळे घाम येतो.
• काहींना आनुवंशिकतेमुळे घाम येतो; तर काही जणांना हार्मोनल इन बॅलन्स झाल्यामुळे घामाचा धोका निर्माण होतो. क्षमतेपेक्षा जास्त घाम येणे या प्रकाराला हायपर हायड्रोसिस असे म्हणतात.
• यात थंड वातावरणात अथवा कुलर असले तरी व्यक्तीला घाम मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
लक्षणे आणि कारणे काय ?
• शरीराच्या विशिष्ट भागामध्ये घाम येतो. हात, पाय आणि विशिष्ट भागात घाम येतो. सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीमच्या माध्यमातून घाम नियंत्रित केला जातो.
• हार्मोनल इन बॅलन्स आणि मधुमेह, रक्तदाब आणि थायरॉइड वाढल्याने घाम येतो. अतिरिक्त घाम येणे हे काही आजारांची लक्षणे असू शकतात, जसे की मधुमेह, थायरॉइड, हृदयविकारामुळे लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
• काहींना आनुवंशिकतेमुळे घाम येतो; तर काही जणांना हार्मोनल इन बॅलन्स झाल्यामुळे घामाचा धोका निर्माण होतो.
अतिरिक्त घाम येणे ही एक साधी समस्या नसून काही वेळा ती गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. जर घाम येणे दैनंदिन जीवनात अडथळा ठरत असेल तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर.
काय काळजी घ्याल?
सैल व सुती कपडे वापरा. स्वच्छता राखा, ताण कमी ठेवा, अँटीपर्सपिरंटचा वापर करा. भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. दररोज अंघोळ करा, दररोज चप्पल बदलून वापरा. योगासने करा. यामुळे या प्रकाराला रोखता येते.
हेही वाचा : पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर
