सांगली येथील मार्केट यार्डमध्ये हळदीची आवक कमी झाल्यामुळे दरात तेजी आहे. राजापुरी हळदीला मंगळवारी सर्वाधिक प्रतिक्विंटल २५ हजार ३०० रुपयांचा दर मिळाला.
हलक्या प्रतीच्या राजापुरी हळदीला १३ हजार ७०० तर सरासरी १५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. दिवसात १३ हजार ४९० क्विंटल हळदीची विक्री झाली आहे.
परपेठ हळदीची दोन हजार ४३९ क्विंटल आवक झाली होती. चांगल्या प्रतीच्या हळदीला प्रतिक्विंटल १५ हजार ५०० रुपये तर सरासरी १२ हजार २५० रुपये दर मिळाला आहे. परपेठ हळदीची आवकही कमी झाली आहे.
राजापुरी हळदीबद्दल
- राजापुरी हळद ही सांगली जिल्ह्यात (महाराष्ट्र) पिकवल्या जाणाऱ्या हळदीची एक प्रसिद्ध जात आहे.
- राजापुरी हळद तिच्या उच्च प्रतीसाठी आणि चव आणि रंगासाठी ओळखली जाते.
- राजापुरी हळद सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकवली जाते.
- या हळदीत कर्करोधी गुणधर्म असतात आणि ती आरोग्यासाठी खूप फायद्याची मानली जाते.
- सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राजापुरी हळदीला चांगला दर मिळतो.
अधिक वाचा: फेडरेशनमार्फत खरेदी बंद झाल्यावर उडीद बाजारभावात झाली मोठी वाढ; कसा मिळतोय दर?