Join us
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंबाच्या दराने पुन्हा घेतली उसळी; वाचा कोणकोणत्या बाजारात मिळतोय उच्चांकी दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 14:35 IST

dalimb bajar bhav घसरणीनंतर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे.

सोलापूर : घसरणीनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सोमवारी बाजारातडाळिंबाची ६१२ क्विंटल आवक झाली असून, दर्जेदार मालाला थेट २४,००० रुपये प्रति क्विंटलचा सर्वोच्च (कमाल) दर मिळाला आहे.

यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बाहेरच्या राज्यांतून दर्जेदार डाळिंबाला पुन्हा मोठी मागणी आल्याने दरात ही सुधारणा झाली आहे.

विशेष म्हणजे, आवक वाढलेली असतानाही बाजारातील सर्वसाधारण डाळिंबाचा सरासरी दर ७,००० रुपयांवर स्थिर राहिला आहे.

डाळिंबाच्या बाजारात तेजी-मंदीचे सत्र सुरू असले तरी कमाल दराने पुन्हा २४ हजारांचा टप्पा गाठल्याने सोलापूरच्या बाजारातील डाळिंबाची पत पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील डाळिंबाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल104500115008000
मुंबई फ्रुट मार्केट---क्विंटल70100001500012500
नाशिकआरक्ताक्विंटल11150055004000
पुणेआरक्ताक्विंटल4282000150008500
संगमनेरभगवाक्विंटल923000125007750
सांगोलाभगवाक्विंटल42440001680010400
सटाणाभगवाक्विंटल128925130009500
आटपाडीभगवाक्विंटल7101000160008500
आटपाडीगणेशक्विंटल380025001600
सोलापूरलोकलक्विंटल6121000240007000
सांगली-फळे भाजीपालालोकलक्विंटल1350001600010500
पुणे-मोशीलोकलक्विंटल5100001500012500
नागपूरलोकलक्विंटल861200060005000
बारामती-जळोचीनं. १क्विंटल460001400012000

अधिक वाचा: महिन्याला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरताय? मग अवघ्या ५ हजारांतच मिळणार सोलर सिस्टीम

English
हिंदी सारांश
Web Title : Pomegranate Prices Surge Again; Highest Rates in These Markets

Web Summary : Pomegranate prices in Solapur surged, reaching ₹24,000 per quintal. High demand from other states boosted rates. Despite increased supply, average prices remain steady at ₹7,000. Solapur market proves its worth again.
टॅग्स :डाळिंबबाजारमार्केट यार्डसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीशेतीसांगलीफळे